केस खूप पातळ झालेत? मग बाजारातील केमिकल प्रोडक्टसचा वापर थांबवा आणि हे हर्बल उपाय करून पहा
बदलत्या वातावरणामुळे केसांचे आरोग्य खराब होत असते. आपल्या त्वचेबरोबरच केसांचीही वेळोवेळी निगा राखणे फार गरजेचे असते. असे न केल्यास, केसांच्या विविध समस्या उद्भवू लागतात. यामध्ये केस पातळ होणे यांचाही समावेश आहे. केस पातळ होण्याने त्याच्या व्हॉल्यूमला हानी पोहोचते आणि यामुळे तुम्ही तुमच्या केसांमध्ये जास्त स्टाइल करू शकत नाही. त्यामुळे ही समस्या दूर करणे गरजेचे आहे. अनेकदा बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टसचा वापर केल्यामुळे आपले केस आणखीन खराब होत असतात.
आम्ही तुम्हाला सांगतो, केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पातळ केस मजबूत करण्यासाठी तुम्ही काही घरगुती पण प्रभावी अशा उपायांचा अवलंब करू शकता. केसांना लांब, मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी त्यांना पुरेसे पोषण आवश्यक आहे, यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा आणि केसांचा मसाज देखील करा. पातळ केसांच्या समस्या रोखण्यापासून ते केसांची खुंटलेली वाढ करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांचा वापर करू शकता.
हेदेखील वाचा – करीना कपूरच्या सुंदर त्वचेचे रहस्य आले समोर, 44 व्या वर्षीही त्वचा नितळ ठेवण्यासाठी करते ‘या’ टिप्सचा वापर
खोबरेल तेल हे लोकप्रिय तेलांपैकी एक आहे. केसांच्या अनेक समस्यांसाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरते. नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच हे टाळूचे रक्षणदेखील करते. नारळ तेल केसांना मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
हेदेखील वाचा – Skincare: कच्च्या दुधापासून बनवलेले हे 5 फेस पॅक चेहरा चमकदार बनवतात, योग्य पद्धत जाणून घ्या
ब्राह्मी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, त्याचे तेल केस लांब आणि मजबूत बनवू शकते. ब्राह्मी तेल केसांना मुळांपासून मजबूत करण्यास मदत करते. तसेच ब्राह्मी तेलाने टाळूची मालिश केल्याने केसांची वाढ झपाट्याने होते आणि यामुळे डोक्याला थंडावाही मिळतो. ब्राह्मी तेल केसांतील कोंडा दूर करण्यासही उपयुक्त ठरतो.
तुमचे केस फार पातळ झाले असतील तर यासाठी तुम्ही ब्राह्मी तेलाचा वापर करू शकता. हे तेल केसांच्या वाढीस मदत करते आणि केस मजबूत बनवते. हे तेल यामुळे कोरडेपणा, कोंडा, खाज सुटणे, स्प्लिट एंड्स आणि फ्लेक्ससारख्या समस्या कमी होतात. केसांना लांब आणि जाड बनवून त्यांना निरोगी ठेवण्यास हे तेल फायद्याचे ठरते.