आपण सुंदर दिसावे असे कोणाला वाटतं नाही. आपले सौंदर्य वाढवण्यासाठी लोक बाजारातील नवनवीन प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र या प्रोडक्टसमध्ये बहुतांश रासायनिक पदार्थांचा समावेश असतो जो आपल्या चेहऱ्यासाठी घातक ठरू शकतो. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. चेहऱ्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर उत्तम मानले जाते. यात कोणतेही हानिकारक घटक नसल्याकारणाने यांचा आपल्या चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर कच्चे दूध y यासाठी फायद्याचे ठरते. याच्या मदतीने तुम्ही विविध प्रकारचे फेस पॅक घरीच तयार करू शकता. जीवनसत्त्वे, प्रथिने आणि लॅक्टिक ॲसिडने समृद्ध असलेले कच्चे दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अगदी सोप्या पद्धतीने आणि अजिबात अधिक वेळ न घालवता तुम्ही सहज हे फेसपॅक घरबसल्या तयार करू शकता.
हेदेखील वाचा – भिंतीवरील काळे डाग घराचा लूक खराब करतायेत? या घरगुती पदार्थांचा वापर करून क्षणार्धात दूर करा हट्टी डाग
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 टेबलस्पून कच्चे दूध आणि 1 टेबलस्पून बारीक ओट्स आवश्यक आहे. या फेस पॅकचा वापर त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी केला जातो. तर कच्चे दूध त्वचेला मॉइश्चरायझ करते. यासाठी ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून याची पेस्ट तयार करा आणि कच्च्या दुधात मिसळून याचा पॅक तयार करा. गुळगुळीत आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.
यासाठी 2 चमचे कच्चे दूध आणि 2 चमचे काकडीचा रस घ्या आणि यांना एकत्र चांगले मिसळा. हा पॅक त्वचेला शांत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी चांगला आहे. काकडीतील गुणधर्म तुमचा चेहरा फ्रेश ठेवण्यास मदत करतील. ताज्या आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा ते लावा.या पॅकचा वापर करत जा.
हेदेखील वाचा – जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम
हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात 2 चमचे पपईचा पल्प घालून नीट मिक्स करा. पपई त्वचा चमकदार बनवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. आंघोळीच्या काही वेळापूर्वी हा पॅक चेहरा आणि मानेवर पूर्णपणे लावा आणि मग धुवून काढा. आठवड्यातून दोनदा या पॅकचा वापर करत जा.
हा पॅक तयार करण्यासाठी प्रथम 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचे चंदन पावडर एकत्र मिसळा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर किमान 10 मिनिटे ही पेस्ट राहू द्या आणि मग पाण्याने चेहरा स्वछ करा. त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी चंदन फायद्याचे मानले जाते.
यासाठी कच्चे दूध आणि ताजे एलोवेरा जेल मिक्स करून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक अगदी स्किन टोन वाढवण्यासाठी उत्तम आहे. चेहऱ्यावर लावा आणि किमान 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे.