
सध्या गरमीचा प्रचंड तडाखा पाहायला मिळत आहे. गरमीच्या लाटेने दिवसा बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. अशातच उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे अन्न पदार्थ लगेच खराब होऊ शकतात. खराब झालेले पदार्थ खाल्ल्यास अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची दाट शक्यता असते. MayoClinic च्या मते, जेव्हा विषारी जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी इ. आपल्या पोटात जाते. यालाच अन्नातून विषबाधा होणे म्हणतात.
गरमीच्या दिवसांत म्हणजेच उन्हाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळेच या ऋतूत खाद्यपदार्थांबाबत खूप काळजी घ्यावी लागते. आपण खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत थोडेसे बेफिकीर राहिलो तर त्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते.
अन्नातून विषबाधेमुळे, व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. यासोबतच उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखीही होऊ शकते. तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही, कारण छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला यापासून वाचवू शकता. सामान्यतः अन्नातून विषबाधा होण्याची समस्या गंभीर नसते, परंतु काही वेळा यामुळे लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते.