Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thyroid: थायरॉईड महिलांचीच समस्या नाही; तणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदूषणाचा पुरुषांच्या ग्रंथीवरही होतोय परिणाम

आता थायरॉईड ही केवळ महिलांची समस्या राहिलेली नाही. पूर्वी महिलांनाच थायरॉईड आजाराचा जास्त त्रास असे. मात्र आता बदललेल्या जीवनशैलीमुळे पुरूषही थायरॉईच्या आजाराला बळी पडत आहेत, कसे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 08, 2026 | 01:30 PM
पुरुषांमध्ये वाढतोय थायरॉईडचा धोका (फोटो सौजन्य - iStock)

पुरुषांमध्ये वाढतोय थायरॉईडचा धोका (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुरुषांमधील वाढता थायरॉईड
  • थायरॉईड केवळ महिलांची समस्या राहिलेली नाही 
  • चुकीची लाइफस्टाइल, तणावामुळे थायरॉईड वाढतोय 
थायरॉईड ही केवळ महिलांची समस्या समजली जात होती. मात्र बदलती जीवनशैली, सततचा तणाव, प्रदुषण,आहाराच्या अनियमित वेळा आणि वाढते प्रदूषण यामुळे आता पुरुषांमध्येही थायरॉईड विकारांचे प्रमाण वाढले आहे. थायरॉईडच्या समस्या या सर्वच वयोगटातील पुरुष आणि महिलांना प्रभावित करू शकतात. वाढता ताण, चुकीची जीवनशैली आणि प्रदूषण यांसारखी विविध कारणे विशेषतः शहरी भागात थायरॉईडच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. डॉ. प्रशांत केवले, ENT, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

काय आहेत कारणं 

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जेवण वगळणे,अनियमित वेळा, मध्यरात्री खाणे, प्रक्रिया केलेल्या अन्नावर अवलंबून राहणे आणि जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन करणे यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. थायरॉईड ग्रंथी या चयापचय प्रक्रिया, ऊर्जेची पातळी आणि वजन नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 

जेव्हा जेवणाच्या वेळा अनियमित असताच आणि पुरक आहाराची कमतरता असते तेव्हा थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही. कामाचे वाढते तास, झोप न लागणे आणि सततचा ताण यामुळे हार्मोनल असंतुलन वाढते. ज्यामुळे थकवा येणे, वजन वाढणे अथवा कमी होणे, केस गळणे आणि मासिक आरोग्यातही बदल दिसून येतात. म्हणूनच थायरॉईड संतुलनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Thyroid रुग्णांसाठी 5 हेल्दी फूड्स ठरतील जीवघेणे, गंभीर दिसतात लक्षणं

प्रदूषण आणि थायरॉईड आरोग्य

सध्या देशभरात वायू प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे प्रदूषित हवा आणि हानिकारक रसायनांच्या संपर्कात येणे ही देखील थायरॉईड समस्यांची प्रमुख कारणं आहेत. जड धातू, कीटकनाशके आणि औद्योगिक रसायनांसारख्या प्रदूषकांमुळे हार्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासांनुसार दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने थायरॉईड ग्रंथी कमी किंवा जास्त सक्रिय होण्याची शक्यता असते. शहर किंवा औद्योगिक भागात राहणाऱ्या लोकांना थायरॉईडच्या समस्यांचा धोका असू शकतो.

पुरुषांमधील थायरॉईड विकाराची लक्षणं आणि कारणे

महिलांप्रमाणेच, पुरुषही थायरॉईडच्या समस्यांचा सामना करतात. तथापि, पुरुषांमधील थायरॉईडच्या समस्यांची नोंद होत नाही कारण त्यांची लक्षणे इतर आजारांच्या लक्षणांसारखीच असतात. या धोक्याच्या लक्षणांकडे अनेकदा ताण किंवा वाढते वय म्हणून दुर्लक्ष केले जाते. पुरुषांनी अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा, कमी झालेला स्टॅमिना, नैराश्य, केस पातळ होणे, स्नायूंचा अशक्तपणा आणि लैंगिक आरोग्याच्या समस्या यांसारख्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. वाढता ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि कौटुंबिक इतिहास ही याची प्रमुख कारणं आहे. निदानास विलंब झाल्याने भविष्यातील गुंतागुंत वाढू शकते.

महिलांमध्ये थायरॉईड झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? जाणून घ्या उपाय

काय करावे

निदानामध्ये रक्त तपासण्यांचा समावेश असतो, ज्यामध्ये थायरॉईड संप्रेरकांची पातळी मोजण्याचा रुग्णाला सल्ला दिला जातो. यशस्वी उपचारांसाठी वेळीच निदान महत्त्वाचे आहे. त्वरित उपचार घेतल्याने पुरेसा आराम मिळण्यास मदत होते.

यावरील उपचार हे थायरॉईडच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि त्यात औषधोपचार, जीवनशैलीतील बदल जसे की व्यायाम, पौष्टिक आहार, योग आणि ध्यानधारणेच्या स्वरूपात तणावाचे व्यवस्थापन आणि दर सहा महिन्यांनी नियमित तपासणीचा समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा वापर करणे आणि विशिष्ट भागातील हवेची गुणवत्ता तपासून मगच बाहेर पडणे हे थायरॉईडचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. महिला तसेच पुरुषांनी देखील थायरॉईडच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वरिल उपायांचे काटेकोरपणे पालन करुन निरोगी जीवनाचा आनंद घ्या.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Thyroid problems are not just a women s issue stress changing lifestyles and pollution are also affecting the thyroid gland in men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Health Tips
  • men health
  • thyroid care

संबंधित बातम्या

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा
1

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा
2

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

गॅस आणि Acidity चा होईल नाश, सकाळपासून रात्रीपर्यंतची To-Do-List; पोट होईल साफ
3

गॅस आणि Acidity चा होईल नाश, सकाळपासून रात्रीपर्यंतची To-Do-List; पोट होईल साफ

Guhagar News: दूषित जलस्रोतप्रकरणी श्रृंगारतळीत आरोग्य पथक दाखल; रहिवाशांना केले आवाहन
4

Guhagar News: दूषित जलस्रोतप्रकरणी श्रृंगारतळीत आरोग्य पथक दाखल; रहिवाशांना केले आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.