
औषधांपेक्षा प्रभावी उपाय! जीवनशैलीत 'हे' 5 बदल करताच टाइप 2 डायबिटीज होईल रिव्हर्स
आता डायबीटीज घालवण्यासाठी अधिकतर लोक औषधांची मदत घेतात पण तुम्हाला माहिती आहे का? आपण आपल्या जीवनशैलीत काही सोपे बदल करुन टाईप २ मधुमेहाला लक्षणीयरित्या रोखू शकतो. जर तुम्हाला प्रीडायबिटीज असेल, म्हणजे तुमची रक्तातील साखर सामान्यपेक्षा जास्त असेल परंतु तुमचा मधुमेह अद्याप विकसित झालेला नसेल, तर योग्य आहार, दैनंदिन व्यायाम आणि हेल्दी लाईफस्टाईलच्या मदतीने टाईप २ डायबीटीज टाळता येते.
दररोज भरपूर चाला
प्रत्येक डायबीटीज रुग्णासाठी महत्त्वीची असलेली गोष्ट म्हणजे जेवणानंतर आवर्जून चालायला जाणे. तुम्ही रोज किमान १०-१५ मिनिटे जेवल्यानंतर चालायला हवे. ही साधी सवय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. शिवाय जेवल्यानंतर चालण्याची सवय स्नायूंना सक्रिय करते आणि इन्सुलिनची आवश्यकता न पडता तुमच्या रक्तप्रवाहातून ग्लुकोज काढून टाकते.
फायबरयुक्त आहार
डायबिटीज असणाऱ्या रुग्णाने आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा सर्वाधिक समावेश करायला हवा. डायबिटीजचे व्यवस्थापन करण्यासाठी, दररोज किमान २५ ग्रॅम फायबरयुक्त आहार घ्या. फायबरयुक्त आहारात बीन्स, मसूर, फळे आणि भाज्या, काजू आणि बिया यांचा समावेश होतो. हे सर्वच पदार्थ आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात.
सॅच्युरेटेड फॅट्सचे निरिक्षण करा
इन्सुलिन प्रतिरोधकता कमी करण्यासाठी, आपल्या सॅच्युरेटेड फॅट्सनाही माॅनिटर करायला सुरुवात करा. सॅच्युरेटेड फॅट्स ही एक प्रकारची चरबी आहे जी मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. तुमच्या एकूण कॅलरीजच्या ६ टक्क्यांपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन करायला सुरुवात करा.
रेजिस्टेंस ट्रेनिंग
याशिवाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही रेजिस्टेंस ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करायला हवे. डायबीटीजसाठी रेजिस्टेंस ट्रेनिंग फार महत्त्वाची आहे कारण ते स्नायूंची ताकद वाढवते. यामुळे परिणामी शरीर ग्लुकोजचा चांगला वापर करु लागते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फॅड डाएट टाळा
फॅड डाएट म्हणजे थोड्या काळासाठी चालणारे डाएट, याऐवजी आपण दीर्घकाळासाठी डाएट करु शकता. केटो, पॅलिओ किंवा ग्लायसेमिक इंडेक्स सारख्या डाएट्समुळे वजन कमी होऊ शकते, परंतु मधुमेह रोखण्यासाठी त्यांचे दीर्घकालीन फायदे पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत. डाएटचा उद्देश फक्त वजन कमी करण्याचे नाही तर दिर्घकाळ त्याला नियंत्रणात ठेवणे देखील आहे. यासाठी आपल्या आहारात भाज्या, फळे, धान्य यांचा नियंत्रित प्रमाणात समावेश करा.
कंसिस्टेंट रहा
सवयींबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंसिस्टेंट राहणे. जेव्हा तुम्ही हार न मानता या सवयींचे पालन कराल तेव्हाच तुम्हाला परिणाम दिसतील. कारण कोणत्याही गोष्टीचे परिणाम हे एका रात्रीत दिसून येत नाहीत. त्यामुळे या सवयींचे दिर्घकाळासाठी पालन करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.