Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relationship Tips: रागाच्या भरातही जोडीदाराला बोलू नका ‘या’ गोष्टी; नातं तुटू शकतं

Never say These Things To Your Partner: नात्यांमध्ये वाद आणि मतभेद सामान्य असले तरी रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम करू शकतात. भावनेच्या भरात केलेले संवाद समोरच्या व्यक्तीला दुखावून नात्यात दुरावा आणि कटुता निर्माण करू शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 07:30 PM
Relationship Tips: रागाच्या भरातही जोडीदाराला बोलू नका ‘या’ गोष्टी; नातं तुटू शकतं
Follow Us
Follow Us:
  • जोडीदाराला बोलू नका ‘या’ गोष्टी
  • नातं तुटू शकतं
  • नातं मजबूत ठेवण्यासाठी काय करावे?
प्रत्येक नात्यात कधी ना कधी वाद आणि मतभेद होणे सामान्य मानले जाते. पती-पत्नी किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांमध्ये छोट्या कारणांवरूनही भांडणे होतात. मात्र रागाच्या भरात बोललेले काही शब्द नात्यावर कायमचा नकारात्मक परिणाम करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. अनेकदा लोक भावनेच्या भरात अशा गोष्टी बोलून जातात, ज्या समोरच्या व्यक्तीच्या मनाला खोलवर दुखावतात. त्यामुळे भांडण संपल्यानंतरही नात्यात कटुता आणि दुरावा निर्माण होऊ शकतो.

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध

मला पश्चात्ताप होतो

पहिली आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, ‘मला तुझ्यासोबत संबंध ठेवल्याचा पश्चात्ताप होतो.’ भांडण कितीही मोठे असले तरी, हे शब्द कधीही बोलले जाऊ नयेत. हे केवळ एक वाक्य नाही, तर ते संपूर्ण नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. एकदा बोलल्यावर ते शब्द मागे घेणे जवळजवळ अशक्य असते आणि त्याचा हृदयावर खोलवर परिणाम होतो.

तू नेहमीच असचं वागतो

तज्ज्ञांच्या मते, “नेहमी” किंवा “कधीच” यांसारखे शब्द नात्यात नकारात्मकता वाढवतात. अशा वाक्यांमुळे जोडीदाराला स्वतःबद्दल कमीपणा वाटू शकतो. सतत टीका केल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि नात्यातील विश्वासही कमकुवत होऊ शकतो.

जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल चुकीचे बोलणे टाळा

भांडण कितीही मोठे असले तरी जोडीदाराच्या कुटुंबाचा अपमान करणे नात्यासाठी धोकादायक ठरू शकते. कुटुंबाबद्दल बोललेले कटू शब्द अनेकदा मनात कायम राहतात. यामुळे भावनिक अंतर वाढण्याची शक्यता असते.

नातं संपवण्याची धमकी देऊ नका

रागाच्या भरात’ मला तुझ्यासोबत राहायचे नाही किंवा हे नातं संपलं’ असे बोलणे नात्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. अशा शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि भावनिक जवळीक कमी होऊ शकते.

वैयक्तिक कमतरतांवर टोमणे मारणे टाळा

जोडीदाराच्या दिसण्यावर, करिअरवर किंवा वैयक्तिक कमजोरीवर टीका करणे नातं अधिक कमजोर बनवू शकते. अशा गोष्टी आत्मसन्मानाला ठेच पोहोचवतात आणि मानसिक ताण वाढवतात.

नातं मजबूत ठेवण्यासाठी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, भांडणाच्या वेळी शांत राहणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे आणि आदराने संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राग तात्पुरता असतो, पण बोललेले शब्द दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी शब्दांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

Parenting Tips: पालकांनो! फक्त मुलींनाच नाही मुलांनाही शिकवा ‘या’ गोष्टी; होईल सर्वांगीण विकास

Web Title: Avoid harsh words to partners strengthen relationship tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Love Relationship tips
  • Relationship issues
  • Relationship Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.