बाबा रामदेव यांनी सांगितले गाढविणीचे दूध पिण्याचे फायदे
योगगुरू बाबा रामदेव अनेकदा त्यांचे आरोग्याशी संबंधित अनुभव शेअर करतात. योगासह आयुर्वेदाला महत्त्व देणाऱ्या स्वामी बाबा रामदेव यांनी दैनंदिन योगाभ्यास करताना गाढवीच्या दुधाचे फायदे सांगितले. गाढविणीचे दूध हे अत्यंत चवदार आणि पचनासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. गाढविणीचे दूध काढून पिण्याची ही संपूर्ण घटना बाबा रामदेव यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये त्यांनी पहिल्यांदा गाढवाचे दूध काढण्याचा अनुभव सांगितला आणि म्हटले, ‘मी याआधी गाय, बकरी, मेंढ्या आणि उंटाचे दूध काढले आहे, पण मी पहिल्यांदाच गाढवाचे दूध काढत आहे. हे दूध केवळ सुपर टॉनिकच नाही तर आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींसाठी फायदेशीर आहे.
बहुतेक लोक गाय आणि म्हशीचे दूध पितात, तर काही लोक बकरीचे दूधदेखील पितात. साहजिकच गाढवाचे दूधही प्यायले जाऊ शकते आणि या दुधाचे अगणित फायदे आहेत, हे ऐकून तुम्हाला नक्कीच थोडे विचित्र वाटेल. या व्हिडिओमध्ये पतंजलीमधील एक डॉक्टरदेखील आहे आणि त्यांनी गाढवाचे दूध पिण्याचे फायदे सविस्तर सांगितले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
गाढवाच्या दुधाचे फायदे
बाबा रामदेव यांनी सांगितले की, गाढवाच्या दुधात लॅक्टोफेरिन नावाचे तत्व मुबलक प्रमाणात असते, जे एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने याला दुजोरा देत इतर दुग्धजन्य जनावरांच्या दुधापेक्षा ते अधिक पौष्टिक असल्याचे सांगितले. बाबा रामदेव यांनी याला “सुपर कॉस्मेटिक” देखील म्हटले आहे, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे असेही मत त्यांनी यावेळी मांडले आहे.
गुड बॅक्टेरिया संपन्न
काय आहे महत्त्वाचे फायदे
डॉक्टरांनी सांगितले की गाढविणीच्या दुधात चांगले बॅक्टेरिया आढळतात, जे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी एजिंग म्हणून काम करतात. यामुळेच गाढवाचे दूध प्यायल्याने वयाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला वयापेक्षा लहान दिसायचे असेल तर या दुधाचा नक्कीच फायदा होतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
गाढवाच्या दुधातील पोषक तत्व
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की गाढवाच्या दुधात जीवनसत्व अ, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक घटक संपूर्ण निरोगी आरोग्य, हाडांची ताकद, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी कार्य करतात.
15 ते 20 किलो होईल वजन त्वरीत कमी, बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक फॉर्म्युला करा ट्राय
क्लिओपात्राचे दिले उदाहरण
बाबा रामदेव यांनी इजिप्शियन महाराणी क्लिओपात्राचे यावेळी उदाहरण दिले, जी तिच्या सौंदर्यासाठी गाढवाचे दूध आणि दही वापरून आंघोळ करायची. त्यांच्या मते ही प्राचीन परंपरा सौंदर्य आणि त्वचा सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सौंदर्यासाठी तुम्ही गाढविणीचे दूध वापरू शकता असा सल्ला त्यांनी आपल्या व्हिडिओत दिलाय
दुधाची ॲलर्जी असणाऱ्यांनी काय करावे?
बाबा रामदेव यांनी सांगितले की, अनेकांना दुधाची ॲलर्जी असते. गाढवीच्या दुधाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ॲलर्जी असलेले लोकदेखील ते पिऊ शकतात. अधिक फायदे मिळविण्यासाठी, आपण या दुधाचा दहीसह वापर करू शकता, ज्यामुळे त्याचे उपचार गुणधर्म वाढतात आणि शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते
स्वामी बाबा रामदेव यांचा सल्ला
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.