
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमधील साचलेले कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रणात! रोज प्या 'हे' आरोग्यदायी ज्यूस, हृदय राहील निरोगी
Bad Cholesterol: पूर्वीच्या काळी जे आजार वयाच्या ६० व्या वर्षांनंतर उद्भवायचे तेच आजार हल्ली तरुण वयात होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटातील व्यक्तींच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीज वाढत्या कोलेस्टरॉलमुळे होतात.(फोटो सौजन्य – istock)
रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीमुळे हृदयाचे आरोग्य बिघडते आणि कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, सतत घाम येणे, धाप लागणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी गोळ्या औषधांच्या सेवनासोबतच आहारात आहारात या ज्युसचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल आणि कोलेस्ट्रॉल कमी होईल.
दुधी भोपळा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी दुधी भोपळ्याची भाजी बनवली जाते. दुधीचे सांबर, भाजी किंवा दुधीचा गोड हलवा सुद्धा बनवला जातो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक नियमित ग्लास उपाशी पोटी दुधाचा रस प्यावा. महिनाभर नियमित सेवन केल्यास सकारात्मक फरक दिसून येतील.
दैनंदिन आहारात बीटचा समावेश करावा. बीट खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बीटचा रस फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन बी, सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सइत्यादी अनेक घटक असतात. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
कडू चवीचे कारलं खायला अनेकांना अजिबात आवडत नाही. कारल्याचे नाव ऐकल्यानंतर तोंड वाकड केलं जाते. पण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कारल्याचा रस प्यायल्यास रक्तात साचून राहिलेली घाण नष्ट होते आणि शरीर स्वच्छ होते. कारल्यामध्ये विटामिन ए, विटामिन ई, विटामिन के आणि फायबर इत्यादी अनेक घटक असतात.
Ans: खराब कोलेस्ट्रॉलला LDL (Low-Density Lipoprotein) असे म्हणतात. याचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका वाढतो.
Ans: डाळिंब, टोमॅटो आणि संत्र्याचा ज्यूस संतुलित आहाराचा भाग म्हणून घेता येतो. मात्र, हे ज्यूस कोलेस्ट्रॉल कमी करण्याची हमखास हमी देत नाहीत.
Ans: टोमॅटोमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून टोमॅटोचा ज्यूस घेणे फायदेशीर ठरू शकते.