जेवताना केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतील अतिशय धोकादायक
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे बऱ्याचदा संपूर्ण आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वतःची तब्येत कायमच निरोगी ठेवणे हे आपल्याला हातात असते. बऱ्याचदा अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात जंक फूडचे सेवन केले जाते. मात्र सतत जंक फूड आणि तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. जेवणताना कळत नकळत केलेल्या चुकांमुळे संपूर्ण शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. तसेच आरोग्यासंबंधित गंभीर आजार वाढू लागतात. त्यामुळे अन्नपदार्थ खाताना ते कशा पद्धतीने खाल्ले जातात, याचा परिणाम सुद्धा आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवताना केलेल्या कोणत्या चुकांमुळे शरीराला हानी पोहचते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी रात्रीच्या वेळी फक्त पाणी प्यायले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यामुळे आतड्यांचे गंभीर नुकसान होते. बऱ्याच लोकांना जेवणाआधी पाणी पिण्याची सवय असते. यामुळे पोट लवकर भरते. तसेच मेंदूला पोट भरल्याचा खोटा संकेत मिळतो. मात्र असे केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते आणि सतत भूक लागते. ज्यामुळे जंक फूड किंवा कोणतेही तिखट तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढू लागते. त्यामुळे जेवणाच्या अर्धा किंवा १ तास आधी पाण्याचे सेवन करू नये. जेवल्यानंतर अर्धा तासाने पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेवतांना टीव्ही पाहण्याची सवय असते. टीव्ही पाहत जेवल्यामुळे आतड्या आणि मेंदुचे कनेक्शन पूर्णपणे बिघडून जाते. ज्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. तसेच जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्यामुळे शरीराचे अतिरिक्त वजन वाढू लागते. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना टीव्ही किंवा मोबाईल पाहू नये. यामुळे पोट भरले की नाही, याचा अंदाज चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नपदार्थ खाताना केवळ जेवण न गिळता, योग्य पद्धतीने चावून खाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. जेवणाचा आनंद घेत पदार्थ खल्लास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.
शरीरासाठी प्रोबायोटिक्स अतिशय महत्वाचे असतात. शरीरातील अन्नपदार्थांचे चांगल्या बॅक्टरीयाशिवाय पचन होत नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जेवण झाल्यावर प्रोबायोटिक घेणे अतिशय महत्वाचे आहे. दुपारच्या जेवणात किंवा जेवणांनंतर तुम्ही दह्याचे सेवन करू शकता.
वाईट खाण्याच्या सवयी म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाची वेळ पाळत नाही किंवा भूक नसतानाही खाता, तेव्हा त्याला अवेळी आणि अनियमितपणे खाणे म्हणतात.जेव्हा तुम्ही अन्न व्यवस्थित चावून खात नाही आणि लवकर गिळता, तेव्हा त्याला खूप जलद खाणे म्हणतात.
वाईट खाण्याच्या सवयींचे आरोग्यावर काय परिणाम होतात?
जास्त प्रमाणात आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.जलद खाणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का?
जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळणे चांगले आहे, कारण ते पचनास त्रासदायक ठरू शकते. जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.