Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम

कुसुम मोहिमेद्वारे विशेष लक्ष वंचित आणि दुर्लक्षित गटांवर ठेवले जाईल जसे की उमा विटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर, आश्रम शाळेतील विद्यार्थी शोधून त्यांना उपचार मिळवून देतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2026 | 02:24 PM
सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम

Follow Us
Follow Us:

कुष्ठरोगाबाबत समाजातील गैरसमज व भेदभाव दूर करण्यासाठी तसेच नव्याने रुग्ण शोधून त्यांना वेळेवर औषधोपचार मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त, जिल्ह्यात ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत विविध उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष केले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. गोपाळ पाटील, प्राथमिक शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि अन्य जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.(फोटो सौजन्य – istock)

मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा

३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग पंधरवडा साजरा केला जाईल. यामध्ये शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रार्थनेच्या वेळी कुष्ठरोग प्रतिज्ञा वाचन, प्रभात फेरी, प्रश्नमंजुषा, रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा, नुक्कड नाटक यासह जनजागृती केली जाईल. महिला बचतगट,भजनी मंडळे, धार्मिक स्थळे, बाजारातील प्रदर्शन, पोस्टर-बॅनर व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यशाळांमार्फत कुष्ठरोगाबाबत माहिती दिली जाईल. कुसुम मोहिमेद्वारे विशेष लक्ष वंचित आणि दुर्लक्षित गटांवर ठेवले जाईल जसे की उमा विटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर, आश्रम शाळेतील विद्यार्थी, कारखान्यात काम करणारे मजूर, या गटांवर आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक प्रत्यक्ष सर्वेक्षण करून कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचार मिळवून देतील.

बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही ‘मुंडे इफेक्ट’, बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार

२०२७ पर्यंत कुष्ठरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट:

जिल्ह्यात २०२७ पर्यंत कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुष्ठरोग हा इतर आजारांसारखा जंतुपासून होणारा आजार असून, योग्य औषधोपचाराने १०० टक्के बरा केला जाऊ शकतो. कुष्ठरोगाचे निदान आणि औषधोपचार सर्व सरकारी दवाखान्यात मोफत केले जातात. हा आजार देवी-देवता, कोप किंवा पापामुळे होत नाही आणि तो अनुवंशिकही नाही. त्यामुळे कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Implement safe maharashtra campaign effectively instructions of collector meena leprosy awareness campaign in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.