Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ सडलेल्या दातांनीच नाही तर घाण साचल्यानेही होऊ शकतो Cancer, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

बऱ्याचदा लोकांचा असा विश्वास आहे की दात स्वच्छ न ठेवल्याने केवळ पोकळी, किडणे आणि हिरड्यांचे आजार होतात, परंतु तोंडाची स्वच्छता नसेल तर कर्करोगासारखे घातक आजारदेखील होऊ शकतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 22, 2025 | 04:40 PM
दातांच्या अस्वच्छेतमुळे तोंडाचा कॅन्सर होतो का? (फोटो सौजन्य - iStock)

दातांच्या अस्वच्छेतमुळे तोंडाचा कॅन्सर होतो का? (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

बऱ्याचदा लोकांचा असा विश्वास आहे की दात स्वच्छ न ठेवल्याने केवळ पोकळी, किडणे आणि हिरड्यांचे आजार होतात, परंतु तोंडाची स्वच्छता कमी असल्याने कर्करोगासारखे घातक आजारदेखील होऊ शकतात. घाणेरडे दात आणि हिरड्या फक्त तोंडापुरते मर्यादित नसून, ते शरीरात तोंडाच्या कर्करोगासह अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण आपल्या दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी घेत नाही तेव्हा तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात. हे जीवाणू हळूहळू संसर्ग वाढवतात आणि हिरड्यांमध्ये जळजळ अथवा हिरड्यांचा आजार निर्माण करतात. जर बराच काळ योग्य काळजी घेतली नाही तर हा संसर्ग कर्करोगाच्या पेशींना चालना देऊ शकतो.

Cancer Awareness Month: केवळ पुरूषांनाच लक्ष्य करतात ‘हे’ कॅन्सर, 7 लक्षणे दिसताच डॉक्टरांना गाठाच

कोणत्या संकेतांकडे द्यावे लक्ष 

दातांची स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण नियमित स्वच्छता न राखल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी कोणत्या संकेताकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे जाणून घ्या

  • वारंवार तोंडात अल्सर: जर तुम्हाला वारंवार तोंडात अल्सर येत असतील आणि ते बराच काळ बरे होत नसतील तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते
  • हिरड्यांमधून रक्त येणे: ब्रश करताना किंवा खाताना हिरड्यांमधून रक्त येणे हे तोंडाच्या आरोग्याच्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते
  • तोंडाची दुर्गंधी: जर तोंडाची दुर्गंधी कायम राहिली तर ते बॅक्टेरियाच्या वाढीचे लक्षण आहे, जे गंभीर आजारात बदलू शकते
  • जिभेवर किंवा हिरड्यांवर पांढरे किंवा लाल पुरळ: ही कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते
  • चघळण्यात किंवा गिळण्यात अडचण: जर तुम्हाला काहीही खाण्यात किंवा पिण्यात अडचण येत असेल आणि ही समस्या बराच काळ टिकत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी

ओरल कॅन्सरपासून वाचण्यासाठी उपाय

  • दिवसातून कमीत कमी दोनदा ब्रश आणि फ्लॉस करा. ब्रश केल्यानेदात स्वच्छ राहतात आणि फ्लॉसिंगमुळे तोंडातून दुर्गंधी येत नाही
  • अँटी-बॅक्टेरियल माउथवॉश वापरल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखता येते
  • सिगारेट, तंबाखू आणि अल्कोहोल हे तोंडाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे. या गोष्टी टाळूनच तुम्ही तुमचे दात आणि शरीर निरोगी ठेवू शकता
  • हिरव्या भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ खा, जेणेकरून दात आणि हिरड्या मजबूत राहतील
  • दर ६ महिन्यांनी एकदा दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्या, जेणेकरून कोणतीही समस्या लवकर लक्षात येईल

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Bad oral health can leads to mouth cancer symptoms you should know and do not ignore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Health News
  • teeth problems

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा
2

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
3

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
4

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.