
हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच 'या' पद्धतीने करा होममेड फेशिअल
Beauty Tips: गणपती सणांचा सगळीकडे मोठा उत्साह आहे. बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. तसेच घरातली लगबग, पूजा, पाहुण्यांची ये-जा करण्यातच संपूर्ण दिवस निघून जातो. अशावेळी स्वतःकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. गणपतीच्या एक किंवा दोन दिवस आधी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जातात. पण हवा तसा ग्लो चेहऱ्यावर येत नाही. हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावरील चमक वाढत नाही. त्यामुळे कायमच महागड्या ट्रीटमेंट, फेशिअल किंवा क्लीनअप करून त्वचेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी घरच्या घरी होममेड फेशिअल करावे. यामुळे त्वचा चमकदार दिसेल आणि त्वचेवर वाढलेला टॅनिंग कमी होईल.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि ड्राय होऊन जाते. अशावेळी महागड्या क्रीम लावल्या जातात. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. फेशिअल करताना सगळ्यात आधी सौम्य फेशवॉशचा वापर करून त्वचा स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर कापसावर गुलाब पाणी घेऊन त्वचेवर लावावे आणि दोन ते तीन मिनिटं त्वचा सुकण्यासाठी तशीच ठेवावी.
त्वचेवर चिकटून राहिलेली धूळ, माती आणि चिकटपणा कमी करण्यासाठी स्क्रब करणे फार आवश्यक आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओट्स, दही एकत्र करून जाडसर पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि चेहरा स्वच्छ दिसेल. स्क्रब करण्यासाठी तुम्ही कॉफी पावडरचा सुद्धा वापर करू शकता.
त्वचा स्क्रब करून झाल्यानंतर चेहऱ्यावर वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. वाफ घेताना खूप वेळ घेऊ नये, यामुळे चेहरा कोरडा पडून जातो. जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर दही आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा आणि तेलकट त्वचा असेल तर चंदनाची पावडर आणि गुलाब पाणी घालून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. फेसपॅक लावून काहीवेळ तसेच ठेवावे आणि कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका.
फेशिअल करून झाल्यानंतर त्वचेवर न विसरता मॉइश्चरायझर लावणे फार आवश्यक आहे, अन्यथा चेहरा कोरडा पडू शकतो. त्वचेची काळजी घेताना केवळ फेशिअल करणे पुरेसे नाहीतर नियमित भरपूर पाणी, पोषक आहार, शारीरिक हालचाल आणि शांत झोप घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे त्वचा आतून सुंदर आणि चमकदार राहण्यास मदत होते. त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टची आवश्यकता नसते. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ सुद्धा त्वचा आतून चमकदार ठेवण्यास मदत ठेवतात.
Ans: योग्य घटकांचा वापर केल्यास त्वचा स्वच्छ, मऊ आणि हायड्रेटेड दिसण्यास मदत होऊ शकते. मात्र कायमस्वरूपी ग्लो मिळेलच असे नाही.
Ans: त्वचेच्या प्रकारानुसार दही, मध, ओट्स, बेसन किंवा अॅलोव्हेरा यांसारखे सौम्य घटक वापरले जाऊ शकतात. लिंबाचा रस किंवा अतिअॅसिडिक पदार्थ थेट चेहऱ्यावर लावणे टाळावे.
Ans: सौम्य फेशिअल साधारण आठवड्यातून एकदा करणे पुरेसे असू शकते. त्वचा संवेदनशील असल्यास त्यापेक्षा कमी वारंवारता ठेवावी.