
Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Winter Skin Care Tips: थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासोबतच त्वचेच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे इत्यादी अतिशय सामन्या समस्या उद्भवू लागतात. वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. अशावेळी त्वचा कायमच सुंदर दिसावी यासाठी बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण वारंवार महागडे स्किन केअर, क्रीम, सीरम लावल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्वचेच्या नाजूक पेशींचे नुकसान होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा काळी पडत असेल तर हे उपाय नक्कीच करून पहावे. यामुळे १५ दिवसांमध्ये त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतील.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रता कमी होऊन जाते. ज्यामुळे हवेमध्ये कोरडेपणा जाणवतो. कोरडी हवा त्वचेमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. त्वचेमधील पाणी कमी झाल्यामुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यासारख्या वाटतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये ऊन जास्त वेळ बसल्यामुळे बरे वाटते पण त्वचा पूर्णपणे काळी पडण्याची जास्त शक्यता असते.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा काळी पडू नये म्हणून गरम पाण्याने त्वचा धुवणे टाळावे. गरम पाण्याच्या वापरामुळे त्वचा काळी पडण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय त्वचा स्वच्छ करण्यासाठी वारंवार फेसवॉशचा वापर करू नये. यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते. त्वचेसाठी शिया बटर, ग्लिसीन किंवा हायड्रॉनिक एसिडयुक्त मॉईश्चरायझर किंवा कोल्ड क्रिमचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा आतून मऊ राहण्यास मदत होते.
थंड वातावरणामुळे पाणी पिण्याची जास्त इच्छा होत नाही. पण तरीसुद्धा भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी, गाजर, बीट आणि आवळा यांसारख्या फळांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्यास कोरडेपणा कमी होईल.
Ans: हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि काळवंडल्यासारखी दिसू शकते.
Ans: त्वचेवरील नैसर्गिक तेज टिकवण्यासाठी नियमित मॉइश्चरायझर लावावे, पुरेसे पाणी प्यावे आणि संतुलित आहार घ्यावा. त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेस पॅक वापरता येतो.
Ans: दररोज चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करावा. त्वचेला मॉइश्चरायझर लावावे आणि घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सनस्क्रीन वापरावे.