
वयाच्या 50 वर्षांनंतर सुद्धा नजर राहील तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा गाजरचे सेवन
वय वाढल्यानंतर हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमी होऊन जाते. डोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा मिळवण्यासाठी चष्मा लावला जातो. पण आहारात गाजर खाल्ल्यास डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. गाजरमध्ये असलेल्या बीटा-कॅरोटीनचे रूपांतर विटामिन ‘ए’ मध्ये होते आणो डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. गाजर हलके वाफवून किंवा उकडवून खाल्ल्यास कठीण पेशी मऊ होतात आणि शरीराला बीटा-कॅरोटीन शोषून घे सोपे होऊन जाते. त्यामुळे जेवताना सॅलडमध्ये गाजरचा आवश्यक समावेश करावा.
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच होतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गाजर खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गाजरमध्ये अविद्राव्य फायबर आणि नैसर्गिक एन्झाइम्स मोठ्या प्रमाणावर असतात, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सक्रिय चालू राहते. दुपारच्या जेवणात आवर्जून काकडी, गाजर, बीट, टोमॅटो इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. सतत येणाऱ्या ताप, सर्दी, खोकल्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा वाढू लागतो. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी गाजरचे सूप किंवा गाजरचा सॅलड म्हणून आहारात समावेश करावा. ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवणारे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स गाजरमध्ये असतात. हिवाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गाजरचा आहारात समावेश करावा.
कच्च्या गाजरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे गाजर हलकासा शिजवून किंवा उकडवून खावा. कच्च्या गाजरांमध्ये अविद्राव्य फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. फायबर, बीटा-कॅरोटीन आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
Ans: हो, गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन A डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
Ans: गाजर पौष्टिक असले तरी केवळ गाजर खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी होतो, असे सिद्ध झालेले नाही. मायोपिया किंवा इतर दृष्टीदोषांसाठी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.
Ans: गाजरातील बीटा-कॅरोटीन, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन करता येते.