Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कढीपत्त्याच्या पानांचे तेल केसांसाठी ठरेल वरदान! केसांमध्ये वाढलेले इन्फेक्शन- कोंडा होईल कायमचा नष्ट

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी कढीपत्त्याच्या तेलाचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस लांबलचक होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2025 | 09:59 AM
कढीपत्त्याच्या पानांचे तेल केसांसाठी ठरेल वरदान!

कढीपत्त्याच्या पानांचे तेल केसांसाठी ठरेल वरदान!

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणारा बदल, धूळ, माती, प्रदूषण, स्ट्रेस, आहारात होणारे बदल आणि केसांच्या वाढीसाठी केल्या जाणाऱ्या केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी किंवा केस गळती थांबणवण्यासाठी कोणत्याही केमिकल आणि हानिकारक रसायनांचा वापर करून बनवलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करू नये. हानिकारक केमिकलचा वापर केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे किंवा केस तुटण्याची समस्या उद्भवू लागते. हल्ली कमीत वयातच महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस गळू लागतात. आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आणि चुकीच्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर केल्यामुळे केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर घरगुती पदार्थांचे वापर करून केसांची गुणवत्ता सुधारावी.(फोटो सौजन्य – pintrest)

सतत केस तुटून कमकुवत झाले आहेत? केसांच्या घनदाट वाढीसाठी प्रभावी ठरेल ‘या’ फळाचा रस, आरोग्याला सुद्धा होतील फायदे

केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर मानला जातो. कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून तयार केलेले तेल केसांसाठी वरदान ठरेल. जेवणातील पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी फोडणी देताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. सकाळी उठल्यानंतर नियमित ४ किंवा ५ कढीपत्त्याची पाने चावून खाल्यास केसांच्या समस्यांसोबतच आरोग्यासंबंधित समस्या सुद्धा दूर होतील. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याचे तेल बनवण्याची कृती? कढीपत्त्याच्या तेलाचे केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

कढीपत्त्याचे तेल बनवण्याची कृती:

कढीपत्त्याची तेल केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात वाटीभर खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कढीपत्त्याची ताजी पाने टाकून उकळवून घ्यावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून नियमित किंवा आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून ठेवा. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केसांच्या समस्या कमी होतील.

कढीपत्त्याचे तेलाने केसांना होणारे फायदे:

कढीपत्त्याचे तेल केसांना लावल्यास केसांच्या समस्या दूर होतील. यासाठी तयार केलेले कढीपत्त्याचे तेल नियमित केसांना लावावे. पण बऱ्याचदा अनेकांना असे वाटते की कढीपत्त्याचे तेल लावून केस गळणे थांबते. पण असे नाही. यासाठी आहारात सुद्धा कढीपत्याच्या पानांचे सेवन करावे. केसांना बाहेरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. संतुलित आहार आणि केसांची योग्य काळजी घेतल्यास महिनाभरात केसांच्या समस्या दूर होतील.

वयाच्या ६० व्या वर्षी निरोगी राहतील शरीरातील सर्वच अवयव! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन

केसांची गुणवत्ता सुधारते:

कढीपत्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो अ‍ॅसिड आणि बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच हे तेल केसांना लावल्यानंतर केसांच्या मुळांना पोषण मिळते. केस मजबूत होतात, केसांमधील कोंडा आणि इन्फेक्शन कमी होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कढीपत्त्याची पाने गुणकारी ठरतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Benefits of curry leaf oil for hair recipe for making curry leaves oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
1

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
2

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
3

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
4

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.