धण्याचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
धावपळीच्या जीवनात सतत खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होत असतात. या चुकीच्या सवयीमुळे प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता आणि बिघडलेली पचनक्रिया. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया या गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. पण काहीवेळा या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोट स्वच्छ न होणे, सतत आंबट ढेकर येणे, पोटात दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर हळूहळू याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होण्यास सुरुवात होते. काही लोक बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध खातात. मात्र गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करावे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Breast Cancer चा सर्वाधिक धोका कोणाला? 40 व्या वर्षी स्वतःची तपासणी का करावी
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात धण्याचे सेवन करावे. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये धण्याना विशेष महत्व आहे. धणे नियमित खाल्यास पोटातील गॅस, अपचन, आणि ब्लोटिंग इत्यादी समस्या नाहीशा होतील. हिवाळ्यामध्ये पचनक्रिया मोठ्या प्रमाणावर बिघडते. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचे धणे टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करा. हे पाणी आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.
धणे खाल्यामुळे थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते. औषधी गुणधर्म असलेले धणे चावून खाल्यास थायरॉईड नियंत्रणात राहील. तसेच तुम्ही सकाळी उठल्यानंतर धणे टाकलेले पाणी पिऊ शकता. हे पाणी आरोग्यासंबंधित इतर समस्यांवर सुद्धा प्रभावी आहे. थायरॉईडमुळे होणारे इतर आजार कमी करण्यासाठी आहारात धणे खावेत किंवा धण्याचे पाणी प्यावे.
हे देखील वाचा: कर्करोग असलेल्या महिलांसाठी प्रजनन क्षमता संरक्षण, म्हणजे नेमके काय?
वाढलेले वजन कमी करण्यासाठी धणे मदत करतात. पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रोजच्या आहारात धणे टाकलेले पाणी प्यावे. यामुळे पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे शरीरावर अतिरिक्त चरबी वाढते. ही चरबी वाढू नये म्हणून धणे खावेत.