कर्करोगाच्या उपचाराने प्रजननास हानी
देशभरात कर्करोगाची प्रकरणे वाढत असताना, अनेक रुग्ण कर्करोगाच्या उपचारानंतर प्रजनन समस्याशी लढा देतात. कर्करोगाच्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांचा क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम तात्पुरते किंवा कायमचे असू शकतात. कर्करोगाच्या उपचाराने प्रजननास हानी पोहोचण्याचा धोका हे रुग्णांचे वय, कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा तसेच कर्करोगाची उपचार पद्धती यावर अवलंबून असते. गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी एग फ्रीझिंग आणि स्पर्म बँकिंगसारखे पर्याय फायदेशीर आहेत. डॉ. सुलभा अरोरा, क्लिनिकल डायरेक्टर, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई यांच्याकडून जाणून घ्या.
तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी एखाद्याच्या पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करतात आणि संप्रेरक पातळीमध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. वंधत्वामु्ळे काही जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात व त्यामुळे दुःख, चिंता, तणाव, नैराश्य आणि एकाकीपणाची भावना येऊ शकते. त्यामुळे अशा जोडप्यांना गर्भधारणा करायची असल्यास त्यांना तत्काळ मार्गदर्शनाची गरज भासते. (फोटो सौजन्य – iStock)
कर्करोग उपचार आणि वंध्यत्व
कर्करोगावरील उपचारामुळे येतेय वंध्यत्व
केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी घातक पेशींना नष्ट करण्यासाठी ओळखल्या जातात परंतु ते प्रजनन प्रणालीवर वाईट परिणाम करतात. विविध अभ्यासांनुसार, स्त्रियांचे अंडाशय अकाली निकामी होऊ शकते किंवा अंड्याची गुणवत्ता कमी होऊ शकते, तर पुरुषांना कर्करोगाच्या उपचारांमुळे शुक्राणू उत्पादन कमी होणे आणि गतिशीलता कमी होऊ शकते. म्हणूनच, कर्करोगाच्या रुग्णांनी पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रजनन सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शिवाय, यशस्वी गर्भधारणेच्या परिणामांसाठी तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
कर्करोगाच्या रूग्णांना गर्भधारणेसाठी महत्वाच्या टिप्स
स्पर्म बँकसारखे पर्याय उपलब्ध
गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांसाठी काही ठराविक उपचार आशेचा किरण ठरत आहे. गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी एग फ्रीझिंग आणि स्पर्म बँकिंग सारखे पर्याय फायदेशीर ठरतात. यशस्वी गर्भधारणेसाठी जोडप्यांनी स्वत: ला विविध प्रजनन उपचार पर्यायांबद्दल जागरुक केले पाहिजे.
हेदखील वाचा – 100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक
तुमची प्रजनन क्षमता चांगली ठेवण्यासाठी अत्याधुनिक पर्याय जसे की ओव्हेरियन टिश्यू क्रायोप्रिझर्व्हेशन आणि टेस्टिक्युलर टिश्यू फ्रीझिंग यांसारख्या प्रक्रियांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्करोगाच्या रुग्णांनी हरुन न जाता कर्करोगाच्या उपचारानंतरही यशस्वी गर्भधारणा करता येते हे लक्षात असू द्या . कर्करोगाच्या रुग्णांनी निराश न होता यशस्वी गर्भधारणेसाठी त्यांच्या प्रजनन आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
शंका सोडवून घ्या
गर्भधारणेच्या प्रवासादरम्यान तुम्हाला ऑन्कोलॉजिस्ट आणि प्रजनन तज्ज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन मिळेल व तुमच्या शंकांचे समाधान करता येईल. जर तुम्ही कर्करोगाचे रुग्ण असाल तर प्रजननक्षमतेवर उपचार घेत असाल, तर तुमच्या स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि गर्भाची योग्य वाढ आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी तपासणी करा. त्याकरिता अजिबात संकोच करू नका आणि यशस्वी गर्भधारणेसाठी तज्ञांनी शिफारस केलेले प्रजनन उपचार पर्याय निवडा. शेवटी, कोणत्याही गैरसमजूतींवर विश्वास ठेवू नका कारण कर्करोगाचे रुग्ण देखील एक उत्तम पालक होऊ शकतात.