Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीमध्ये सतत कंबर दुखते? मग उपाशी पोटी करा ‘या’ बियांचे सेवन, कंबर दुखी होईल मुळापासून गायब

थंडीच्या दिवसांमध्ये सतत कंबर दुखणे. हात पाय दुखणे, पाठ दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी अळीव बियांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2024 | 05:30 AM
कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी अळीव खावेत

कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी अळीव खावेत

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या दिवसांमध्ये सर्दी, खोकल्यासह इतरही समस्या उद्भवतात. त्यामुळे पौष्टिक आहार घेऊन आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांमध्ये सतत कंबर दुखणे. हात पाय दुखणे, पाठ दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कोणत्याही जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यानंतर वर उठताना मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. कंबर दुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर अनेक लोक मेडिकल मध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र या गोळ्यांचे सतत सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी अळीव खावेत:

औषधी गुणधर्म असलेले अळीव आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. अळीवमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिनं, फायबर, आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. लाल रंगाच्या नाजूक साजूक बिया आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित या बियांचे सेवन करावे. बाजारात अळीव सहज उपलब्ध होतात. थंडीच्या दिवसांमध्ये अळीव खाल्यामुळे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी अळीव बियांचे नियमित सेवांह केल्यास कंबर दुखीच्या वेदनांपासून कायमचा आराम मिळेल.

अळीवाचे सेवन कसे करावे?

अळीव पासून खीर बनवली जाते. शिवाय लाडू किंवा मुखवास बनवताना अळीव बियांचा वापर केला जातो. रिकाम्या पोटी अळीव बियांचे सेवन केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच तुम्ही या बिया तूप आणि दुधात मिक्स करून खाऊ शकता. यामुळे शरीराला पोषण मिळेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अळीव, हळद आणि दूध एकत्र मिक्स करून खाल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. तसेच थंडीमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होईल.

हाडे मजबूत होतात:

हाडांमधील ताकद आणि उर्जा टिकवून ठेवण्यासाठी नियमित अळीव बियांचे सेवन करावे. या बिया हाडांचे आरोग्य मजबूत करण्यास मदत करतात. अळीव बियांमध्ये असलेले गुणधर्म सांधेदुखी आणि कंबर दुखीपासून वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. अळीव बियांचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. त्यामुळे रोजच्या रोज पाण्यासोबत किंवा दुधासोबत अळीव बियांचे सेवन करावे. यामुळे कंबर दुखीचा त्रास कमी होईल.

लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पचनक्रिया सुधारते:

अळीव बियांचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जातात, ज्यामुळे पचनाची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे नियमित अळीव बियांचे सेवन करावे. अळीव बियांचे नियमित सेवन केल्यामुळे कंबर दुखीचा त्रासासोबतच पचनक्रिया सुधारते आणि शरीर मजबूत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of eating aliv seeds how to consume aliv should be eaten to get relief from back pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • winter health tips

संबंधित बातम्या

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
1

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
3

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
4

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.