मसाल्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मसाल्यांच्या वापरामुळे पदार्थाच्या चवीसोबतच आरोग्यसुद्धा अनेक फायदे होतात. त्यातील प्रामुख्याने वापरला जाणारा मसाला म्हणजे ओवा. चवीला तिखट असलेला ओवा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. ओव्याच्या सेवनामुळे पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. फोटो सौजन्य-istock)
ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरुमांचे डाग घालवण्यासाठी ओव्याचे पाणी प्रभावी आहे. या पाण्याच्या सेवनामुळे पिंपल्स, मुरूम कमी होतात.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी तयार करताना ग्लासात पाणी घेऊन त्यात ओवा भिजत ठेवावा. सकाळी उठवू पाण्यासह ओवा चावून खाल्यास पचनक्रिया सुधारेल.
ओव्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करते. शिवाय वेदना कमी होतात. तुम्ही ओव्याचे नुसतेच सुद्धा सेवन करू शकता.
पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होईल.
मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे कंबर दुखी, पोट दुखी इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.