Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेह असो वा पचनाचे विकार… कडुनिंबाचे पान म्हणजेच वरदान!

जर तुम्ही मधुमेह किंवा इतर कोणत्या आजाराने ग्रस्त असाल तर कडुनिंबाचे सेवन तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. कडुनिंबाच्या पानाचे सेवन केल्यास होणारे फायदे एकदा जाणून घ्याच की!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आजच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही एक सामान्य बाब झाली आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, कमी झोप आणि मानसिक तणाव यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा स्थितीत आयुर्वेदात सांगितले गेलेले काही पारंपरिक उपाय आपल्याला नैसर्गिकरित्या निरोगी ठेवू शकतात. त्यातीलच एक प्रभावी उपाय म्हणजे रिकाम्या पोटी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन!

Nosepin: तुमच्या सौंदर्यात भर घालतील अशा ‘कुंदन नथ’: ‘या’ डिझाईन्स एकदा पाहाच

कडुनिंबाचे आरोग्यावर प्रभावी फायदे

आयुर्वेदानुसार कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3-4 कोवळी पाने चावून खाल्ल्यास अनेक शारीरिक त्रासांपासून बचाव होऊ शकतो.

1. पचनतंत्र सुधारते:

कडुनिंबाच्या सेवनामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. पाचक रसांची निर्मिती वाढून पचनक्रिया सक्षम होते.

2. दात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:

कडुनिंब चघळल्याने तोंड स्वच्छ होते, दुर्गंधी दूर होते, मसूळांची सूज कमी होते आणि दात मजबूत होतात. त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी हे एक नैसर्गिक टॉनिक आहे.

3. रक्तशुद्धी आणि त्वचेसाठी लाभदायक:

कडुनिंब शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो, त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. मुरुम, त्वचारोग यावरही याचा चांगला परिणाम होतो.

4. मधुमेहावर नियंत्रण:

कडुनिंबामधील फ्लावोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स पेशींना इन्सुलिनसाठी संवेदनशील बनवतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. मधुमेहींसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.

5. यकृत डिटॉक्स आणि मेटाबॉलिझम सुधारणा:

कडुनिंब यकृतासाठी डिटॉक्स एजंटसारखे कार्य करते. त्यामुळे लिव्हर हेल्दी राहते आणि चयापचय दर सुधारतो. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात? मग घरी बनवून पहा हॉटेल स्टाईल Paneer Chili Dry

सावधगिरी:

कडुनिंब खूप प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचे मर्यादित आणि सल्ल्यानुसारच सेवन करावे. कडुनिंब हे घरगुती उपायांतील एक प्रभावी औषध आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी त्याच्या कोवळ्या पानांचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात आणि आरोग्य टिकवले जाते. आयुर्वेदाने दिलेले हे नैसर्गिक वरदान प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे.

Web Title: Benefits of eating leaves of neem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Health News
  • lifestyle news

संबंधित बातम्या

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास
1

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
2

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा
3

International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत
4

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.