Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण

चिकन मटणापेक्षाही तुमच्या शरीरात विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी एक भाजी उत्तम मदत करते आणि या भाजीचा स्वाद तर उत्तम आहेच पण आरोग्यासाठीही भरपूर फायदे मिळतात

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2025 | 04:03 PM
विटामिन डी ची कमतरता भरून काढेल ही शाकाहारी भाजी (फोटो सौजन्य - iStock)

विटामिन डी ची कमतरता भरून काढेल ही शाकाहारी भाजी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • विटामिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत 
  • कोणती शाकाहारी भाजी असते विटामिन डी युक्त 
  • मशरूम खाण्याचे काय आहेत फायदे 

बरेच लोक मांसाहारी असतात आणि इतकंच नाही तर त्यांचं असं म्हणणं असतं की चिकन आणि मटणाच्या चवीसमोर सर्व काही अपयशी ठरते. काही वेळा लोक ‘तुम्ही शाकाहारी कसं खाता?’ असाही प्रश्न विचारायला कमी करत नाहीत. पण चिकन मटणापेक्षाही एक शाकाहारी भाजी जास्त चव देते. शिजवल्यानंतर ही भाजी अगदी मांसाहारासारखीच दिसते आणि या कमालीच्या भाजीचे शरीरालाही अनेक फायदे मिळतात.

आम्ही मशरूमबद्दल बोलत आहोत, जे काही लोक खाणे टाळतात. त्यांना वाटते की मशरूम हे मांसाहारी अन्न आहे. पण मशरूमची भाजी ही पूर्णपणे शाकाहारी आहे. शाकाहारी लोकांनी मशरूम खावेच, कारण ते व्हिटॅमिन डी ची कमतरता टाळते. चला जाणून घेऊया मशरूम खाण्याचे फायदे (फोटो सौजन्य – iStock) 

व्हिटामिन डी साठी उपयुक्त 

हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. स्नायूंना काम करण्यासाठीदेखील विटामिन डी ची आवश्यकता भासते. विटामिन डी हे सहसा मांसाहारी अन्नात आढळते, परंतु अनेक मशरूम ‘यूव्ही ट्रीटमेंट’ करून विकले जातात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, त्याचे एर्गोस्टेरॉल अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यावर व्हिटॅमिन डी बनते.

घरबसल्या हाडांमध्ये वाढेल Vitamin D! रोजच्या आहारात नेहमीच करा ‘या’ फळांचे सेवन, सांध्यांमधील वेदना होतील कायमच्या दूर

मेंदूचे कार्य सुधारणे

ज्यांना त्यांच्या मेंदूच्या कार्यात समस्या दिसते त्यांनी नियमित मशरूमचे सेवन केले पाहिजे. अनेक वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की मशरूममधील पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात, जे अल्झायमर आणि पार्किन्सनचे मुख्य कारण आहे असं मानले जाते. 

वजन कमी करण्यास मदत

मशरूम हे अन्न तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींसह मशरूम खाल्ल्याने वजन राखण्यास मदत होते. लठ्ठपणा टाळण्यास ते खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही आठवड्यातून साधारण २-३ वेळा मशरूम नक्कीच खाऊ शकता. मशरूम प्रमाणात खाल्ल्यास तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळते. 

शरीरात सतत थकवा जाणवतो? विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

रक्तदाब कमी करणे

रक्तदाब वाढणे हृदयासाठी धोकादायक आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. परंतु तुम्ही मशरूम खाऊन ते कमी करू शकता, त्यात पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आहे. रक्तदाबाचा प्रत्यक्ष परिणाम हा हृदयावर होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आपल्या आहारात मशरूमचा वापर करून घ्यावा. 

आतड्यांचे आरोग्य चांगले राहील

आतड्याचे आरोग्य त्याच्या बॅक्टेरियावर अवलंबून असते. मशरूम खाल्ल्याने हे निरोगी बॅक्टेरिया वाढू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रिफ्लक्स रोग इत्यादींचा धोका कमी होतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. आतड्यांमध्ये त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आहारात मशरूम खावे. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of eating mushroom more tasty than chicken mutton powerful for vitamin d deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Tips
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्तरांनी दिलाय सल्ला
1

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्तरांनी दिलाय सल्ला

एक IVF अयशस्वी झाल्यास पुन्हा द्यावे लागतात पैसे? तज्ज्ञांचे योग्य उत्तर, तुम्हीही करताय का विचार
2

एक IVF अयशस्वी झाल्यास पुन्हा द्यावे लागतात पैसे? तज्ज्ञांचे योग्य उत्तर, तुम्हीही करताय का विचार

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला
3

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष
4

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.