Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे चेहरा सतत चिकट होतो? मग वापरून पहा ‘हे’ फेसमास्क

पावसाळ्यातील आर्द्रतेचा परिणाम त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये कितीही त्वचेची काळजी घेतली तरीसुद्धा त्वचा तेलकट आणि चिकट होते. तेलकट त्वचेवर मेकअप केल्यानंतर मेकअप लगेच खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेकअप करण्याआधी त्वचेला कोणते फेसमास्क लावावे, याबद्दल सांगणार आहोत. हे फेसमास्क लावल्यामुळे त्वचेमधील आद्र्रता टिकून राहील आणि चेहरा सुंदर आणि चमकदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 11:15 AM
मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क

मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क

Follow Us
Follow Us:

क्षणभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यभरात सगळीकडे हजेरी लावली आहे.वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. रोगराई वाढल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हवेमध्ये गारवा आणि आर्द्रता असते. या आद्रतेचा सगळ्यात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असल्यावर चेहरा पूर्णपणे तेलकट होऊन जातो. त्वचेवर चिकटपणा आणि तेलकटपणा वाढतो. चेहऱ्यावर तेल दिसू लागल्यानंतर तात्काळ चेहरा स्वच्छ केला नाही तर मुरूम किंवा किंवा पुरळ येतात.

चेहऱ्यावर साचलेल्या तेलामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स काही दिवसांनंतर निघून जातात, मात्र त्यांचे डाग तसेच राहतात. तेलकट चेहऱ्यावर मेकअप करणे पावसाळ्यात कठीण होऊन जाते. मेकअप केल्यानंतर घाम आला की सगळं मेकअप निघून जातो. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर फेसमास्क लावा. फेस मास्कमुळे त्वचा हायड्रेट राहून चेहऱ्यावर तेल कमी होते. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर कोणते फेसमास्क लावावे, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: गरोदरपणात महिलांनी खावे रोज काळे ड्रायफ्रूट, 5 फायद्यांसह भासणार नाही Iron ची कमतरता

मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क

फळांचा फेसमास्क:

बाजारात मिळणाऱ्या फळांपासून तुम्ही घरच्या घरी फेसमास्क बनवू शकता. फळांमध्ये असलेले गुणधर्म त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही केळी, सफरचंद, पपई आणि संत्री हे चार फळे एकत्र करून फेसमास्क बनवू शकता. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळेल आणि त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील. फळांच्या फेसमास्कमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन चेहऱ्याचा रंग सुधारेल.

मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क

कूलिंग मास्क:

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी काकडी प्रभावी आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी काकडीचा वापर करावा. फेसमास्क बनवण्यासाठी काकडीचा रस काढून त्यात मिल्क पावडर आणि अंड्याचा पांढरा बल्क मिक्स करा. तयार केलेला मास्क चेहऱ्याला लावून फेसमास्क कोरडा झाल्यावर पाण्याने स्वच्छ करा.

हे देखील वाचा: सकाळच्या ‘या’ 5 सामान्य चुका वाढवतात आपल्या शरीरातील चरबी, प्रत्येकाने जाणून घेणे महत्वाचे

मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क

मुलतानी माती मास्क:

मुलतानी मातीचा वापर मागील अनेक वर्षांपासून त्वचेसाठी केला जात आहे. फेसमास्क बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी टाका.जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेवरील तेल कमी होऊन चेहऱ्यावर ओलावा टिकून राहील. फेसमास्क कोरडा झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.

 

ब्युटी टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Best face mask for your sticky face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • lifestyle tips
  • Skin Care

संबंधित बातम्या

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
1

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.