फोटो सौजन्य: Freepik
बदलत्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या आहारांमुळे आपल्या अनेकांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. घरातील भाजी-भाकरीची जागा फ्रँकी, बर्गर आणि पिझ्झाने घेतली आहे. हे जंक फूड चवीला जरी उत्तम वाटत असले तरी आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आज कित्येक जण दिवसणुतून अनेक वेळा जंक फूड खात असत. यालाच आपण जंक फूडच्या आहारी जाणे असे म्हणतो.
लठ्ठपणाची लक्षणे दिसू लागताच अनेक जण मग जिमची वाट धरताना दिसतात. काही जण तर जास्त तीव्रतेने व्यायाम करण्यास सुरुवात करतात. परंतु हा तीव्र व्यायाम तुमच्या आरोग्याला तीव्र वेगाने हानी पोहचवू शकतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या दिवसभरातील शारीरिक क्रिया व आहारांच्या सेवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
हे देखील वाचा: घरीच बनवा बेकरीसारखे मऊ लुसलुशीत टेस्टी डोनट्स; नोट करा रेसिपी
याव्यतिरिक्त, तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. सकाळी होणाऱ्या चुकांचा पहिला परिणाम शरीराच्या वजनावर दिसून येतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे वजन अचानक वाढताना दिसत असेल, तर ही सूचना आहे की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने होत आहे. चला जाणून घेऊया, अशा 5 चुकांबद्दल ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.
सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म आणि भूक बिघडते. अनियमित झोपेमुळे भूक वाढते. अशा स्थितीत अनहेल्दी अन्न खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका वाढतो.
पाणी न पिणे
तुमच्या दिवसाची सुरुवात नेहमी पाणी पिऊन करावी. याशिवाय डिहायड्रेशनमुळे जास्त भूक लागते, अशा स्थितीत लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत असलेल्या कॅलरीजचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
दिवसाची सुरुवात गोड पेयांनी करणे
चहा आणि कॉफीसारख्या गोड पेयांमध्ये अतिरिक्त कॅलरीज असतात, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. या पेयांमुळे रक्तातील साखरेमध्ये जलद वाढ होते ज्यामुळे अधिक भूक निर्माण होते. परिणामी आपण जास्त अन्न खातो.
बहुतेक लोकं आपल्या बिझी शेड्युलमुळे नाश्ता करत नाहीत, परंतु नाश्यातील पदार्थ दिवसातील सर्वात महत्वाचे अन्न असते. जे लोक नाश्ता करत नाहीत ते दुपारच्या वेळेस जास्त अन्न खातात आणि चुकीच्या सवयींना बळी पडतात. लठ्ठपणा वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
प्रोटिन्स भूक नियंत्रित करण्यास आणि स्नायू अजून बळकट बनवण्यास मदत करतात. प्रौढ व्यक्तीने आपल्या नाश्तामध्ये 30 ग्रॅम प्रोटिन्सचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही असे करत नसाल आणि प्रोटीनऐवजी हार्ट कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खात असाल तर तुमच्या शरीरातील चरबी वाढू शकते.