Black Raisins Benefits In Pregnancy: गरोदरपणात महिलांना स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक पदार्थ खावे लागतात. तसंच प्रत्येक महिलेला या काळात काही ना काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळी काळ्या मनुका खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काळ्या मनुकांचे गरोदरपणात खाण्याचे काही फायदे सांगितले आहे. योग्य प्रमाणात काळ्या मनुका वा बेदाणे खाल्ल्यास हेल्दी राहण्यास मदत मिळते. यातील शक्तीशाली अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व आई आणि बाळासाठी उत्तम ठरते. (फोटो सौजन्य - iStock)
गरोदरपणात रक्ताची कमतरता होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी गरोदर महिलांनी आपल्या आहारामध्ये काळ्या मनुकांचा समावेश करून घ्यावा
गर्भधारणेदरम्यान लोहाच्या कमतरतेचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे गर्भातील मुलाच्या विकासात अडथळा निर्माण होतो. काळ्या मनुका लोहाचा समृद्ध स्त्रोत असल्याने अशक्तपणा टाळण्यास मदत करू शकते
काळ्या मनुका हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे गर्भवती महिलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात
गरोदरपणात पचनाशी संबंधित अनेक समस्या असतात, त्यामुळे काळ्या मनुका खाणे खूप फायदेशीर ठरते. यात फायबर आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात जे पचनसंस्थेला मदत करतात
गरोदरपणात बाळाच्या आरोग्यासाठी काळा मनुका खूप फायदेशीर आहे. काळे मनुके खाल्ल्याने हाडांचा विकास होतो, मेंदूची शक्ती वाढते आणि मुलामध्ये जन्मजात दोष टाळता येतात
काळ्या मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर असते ज्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर ठरते. काळ्या मनुकांमध्ये फायबर, फॉलिक ऍसिड, झिंक, मॅग्नेशियम समृद्ध असून हृदयावरील ऑक्सिडेटिव्ह प्रभाव कमी करतात
टीपः गरोदरपणात काय खावे आणि काय खाऊ नये याचा योग्य सल्ला आपल्या डॉक्टरांकडून घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही