
गॅस आणि असिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सतत बाहेरचे आणि पचनास जड असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत बाहेरचे पदार्थ खाणे, तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्यामुळे पोटात गॅस होणे, अपचन होणे इत्यादी गोष्टींमुळे तीव्र डोके दुखी वाढू लागते. सामान्यपणे डोके दुखीचा त्रास सगळ्यांचं होतो. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक पेनकिलर किंवा इतर गोळ्या औषध खातात. पण नेमकं कशामुळे डोके दुखी होत आहे, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचे आहे.
डोकं दुखीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू मानेच्या शिरासुद्धा दुखु लागतात. डोकं दुखण्यासोबतच आंबट ढेकर येणे, उलट्यांचा त्रास होणे, अंगावर लाल चट्टे येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. असिडिटीचा त्रास वाढू लागल्यानंतर डोकं दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहावे. घरगुती उपाय केल्यामुळे डोकं दुखीवर आराम मिळवता येतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला पोटातील गॅसमुळे डोकं दुखत असेल तर कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: विटामिन डी च्या कमतरतेमुळे होऊ शकते शरीराचे गंभीर नुकसान, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
अपचन आणि असिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाणी आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. लिंबामध्ये असलेले विटामिन सी आणि फायबर असिडिटी कमी करण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून प्या. यामुळे तुमची असिडिटी कमी होईल.
पोट दुखीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर ओव्याचे पाणी प्यायले जाते. ओव्याच्या पाण्यात असलेले गुणधर्म पोटातील गॅस कमी करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करते. यामुळे डोकेदुखी थांबून आराम मिळेल. ओव्याचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा टाकून त्यात काळे मीठ टाकून काहीवेळ ठेवून नंतर ओव्याचे पाणी प्यावे.
हे देखील वाचा: बटाट्याचे चिप्स आरोग्यासाठी गुणकारी आहेत का? जाणून घ्या आहारतज्ज्ञांचे मत
आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे असिडिटी, अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. पोटात गॅस वाढल्यामुळे डोके दुखी होत असल्यास तुम्ही आल्याचा चहा बनवून पिऊ शकता. आल्याचा चहा बनवण्यासाठी टोपात पाणी घेऊन त्यात अर्धा इंच आलं टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर त्या पाण्यात तुम्ही मध सुद्धा टाकू शकता.