चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्याचे वेफर खायला खूप आवडतात. कुरकुरीत आणि चवीला खारट असलेले वेफर सगळेच लोक आवडीने खातात. वेफर खाल्यानंतर काहीवेळ भूक लागत नाही. अनेक लोक संध्याकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी बटाट्याचे किंवा केळ्याचे वेफर खातात. लहान मुलांना भूक लागल्यानंतर अनेकदा ते आईवडिलांकडे खाण्यासाठी वेफर मागतात. पण हेच वेफर आरोग्यासाठी पौष्टीक आहेत का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. तेलकट आणि खारट वेफर अतिप्रमाणात खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या चिप्समध्ये कोणते घटक आढळून येतात? बटाट्याचे चिप्स आरोग्यासाठी खरंच गुणकारी आहेत का? यावर आहारतज्ज्ञांचे नेमके काय मत आहे, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
कॅलरी: 131
एकूण कार्बोहायड्रेट: 20 ग्रॅम
आहारातील फायबर: 1 ग्रॅम
एकूण साखर: 1 ग्रॅम
प्रथिने: 1 ग्रॅम
एकूण चरबी: 5 ग्रॅम
संतृप्त चरबी: 0.7 ग्रॅम
कोलेस्टेरॉल: 0 मिग्रॅ
सोडियम: 150 मिग्रॅ
पोटॅशियम: 202 मिग्रॅ
विटामिन सी: 0 मिग्रॅ
हे देखील वाचा: 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी
चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
हे देखील वाचा: वजन कमी करण्यापासून ते कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल ‘हा’ मसाल्यातील पदार्थ
बटाट्याचे तळलेले खारट आणि तेलकट वेफर खाण्यापेक्षा फुलगोबी आणि रताळ्याचे वेफर खावेत. हे वेफर आरोग्यासाठी सुद्धा पौष्टीक आणि गुणकारी असतात. तेलात तळून वेफर खाण्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये वेफर बनवून खावेत. तसेच तुम्ही व्हेजपासून, झुचीनीपासून कोबी इत्यादी पदार्थांपासून वेफर बनवून खाऊ शकता.