वजन घटवण्यासाठी चपातीच्या पिठात मिसळा हे पदार्थ, मेणासारखी चटकन वितळेल चरबी
आजच्या बदलत्या युगात अनेक गोष्टी फार बदलल्या आहेत. लोकांच्या पेहरावासोबतच खाण्याच्या पद्धतींमध्येही आता बदल झाले आहेत. आता लोक घरातील कमी आणि बाहेरचे फास्ट फूड खाण्यावर अधिक भर देतात. परिणामी त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते. अनेकदा हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करून पाहतात मात्र त्यांचे वजन काही केल्या कमी होत नाही. मुळातच वाढलेले वजन कमी करणे काही सोपी गोष्ट नाही. यासाठी व्यायाम आणि खाण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे लागते.
वजन वाढत असल्याकारणाने अनेक लोक चापट पूर्णतः खाणे टाळतात. परंतु, आपल्या शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट आणि फायबर्सचा एक चांगला स्त्रोत म्हणजे चपाती. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी चपाती पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुम्ही चपातीच्या पीठामध्ये काही आरोग्यदायी घटकांचा समावेश करून वजन नियंत्रणात ठेवू शकता.
हेदेखील वाचा – गांजा पिणाऱ्यांना कळतच नाही नक्की मेंदूत काय होतंय? यामागील विज्ञान काय सांगतं
हेदेखील वाचा – एक वाटी साखरेने आरशासारखा लख्ख चमकेल चेहरा, गणेश चतुर्थीनिमित्त घरच्या घरी ट्राय करा हा नॅचरल स्क्रब
जिरे हा आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. अनेकदा फोडणी देताना याचा वापर केला जातो. जिरे आपल्या शरीरासाठी फार लाभदायक आहे. याच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवता येते. हे मेटाबॉलिज्म वाढवते आणि पचनशक्ती सुधारते. चपातीच्या पिठात जिरे मिसळल्याने चपातीची चवदेखील वाढते. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी याची मदत होऊ शकते.
आयुर्वेदामध्ये मेथीच्या दाण्यांना फार महत्त्व आहे. अनेक आजर दूर करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर केला जातो. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रियेला चालना देण्यासाठी मेथीच्या दाण्याची मदत होते. तुम्ही चपातीच्या पिठात मेथीचे दाणे मिसळू शकता. यामुळे पचनक्रिया सुधारून भुक कमी लागते. तसेच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
आल्याची पावडर वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवते आणि पचनशक्ती सुधारते. आल्याची पावडर शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चपातीच्या पिठात आल्याची पावडर मिसळून खाता येऊ शकते.