Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

लग्नानंतर जोडीदारासोबत निवांत आणि रोमँटिक वेळ घालवण्यासाठी हनिमून हा खास अनुभव असतो. इंटरनॅशनल हनिमूनचा प्लॅन करत असाल, तर निसर्गसौंदर्य, रोमँटिक वातावरण आणि अनोख्या अनुभवांनी भरलेली ही ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 08:38 AM
Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Follow Us
Follow Us:
  • निसर्गसौंदर्य आणि रोमँटिक वातावरणाचा मनमुराद आनंद घेता येईल.
  • समुद्रकिनारे, सुंदर सूर्यास्त आणि अनोखे नैसर्गिक अनुभव मिळतील.
  • जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी ही ठिकाणे ठरू शकतात उत्तम पर्याय.
लग्नानंतर नवविवाहित जोडपे हनिमूनचा निश्चितच प्लॅन करतात. जोडीदारासोबत मोकळा वेळ घालवण्यासाठी हनिमून कम वेकेशन एक चांगला पर्याय ठरतो. अधिकतर जोडपी यासाठी रोमँटिक ठिकाणाची निवड करतात. तुमचं बजेट चांगल असेल आणि जोडीदारासोबत इंटरनॅशनल ट्रीपचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण या लेखात जगातील काही फेमस आणि ट्रेंडी स्पाॅट्स जाणून घेणार आहोत जे तुमच्या हनिमूनसाठी एक परफेक्ट डेस्टीनेशन ठरतील. इथले वातावरण आणि नैसर्गिक साैंदर्य सर्व चिंता-ताण दूर करते. इथे जाऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक चांगला वेळ घालवू शकता आणि येथील आठवणी मनात साठवून ठेवू शकता. चला तर मग यात कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

ग्रीस

दक्षिण यूरोपमध्ये वसलेला ग्रीस हा एक सुंदर देश आहे. इथे तुम्हाला ऐतिहासिक स्मारके, सुंदर समुद्रकिनारे, नेत्रदीपक सूर्योदय आणि चविष्ट खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. हनिमूनसाठी खास करुन लोक या ठिकाणाची निवड करतात. इथे तुम्ही अथेन्सचे ॲक्रोपोलिस, अपोलो मंदिर, मेटिओरा आणि कॉर्फूचे जुने शहर यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. इथली नाईड लाईफ सर्वात खास मानली जाते. एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर हा काळ ग्रीसला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

आइसलँड

जर तुम्ही हनिमूनसाठी स्वर्गाहून सुंदर अशा ठिकाणाच्या शोधात असाल तर आइसलँड तुमच्यासाठी परफेक्ट आहे. इथे कॅफे लाईफस्टाईल आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटता येतो. येथील नैसर्गिक साैंदर्य अनेक पर्यटकांच्या मनात घर करुन बसतं. हनिमूनसाठी हे एक रोमँटिक, निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे जोडीदारासोबत शांत वेळ घालवता येऊ शकतो. इथली स्पेशॅलिटी म्हणजे नॉर्दन लाईट्स, इथे गेलात तर नॉर्दन लाईट्सचा अनुभव एकदा नक्कीच घ्या. येथील अद्भूत साैंदर्य काल्पनिक जगाचा भास करुन देते. या लाईट्सना ऑरोरा बोरेलिस (Aurora Borealis) असं म्हटलं जातं. यात आकाश हिरव्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या छटांमध्ये बदलते.

हवाई आयलँड

हनिमूनला स्पेशन बनवण्यासाठी तुम्ही हवाई आयलँडचीही निवड करु शकता. बेटावरील शांतता, रोमँटिक वाईब्स आणि निसर्गसाैंदर्य तुमच्या हनिमूनची मजा द्विगुणित करेल. शहरापासून दूर एका वेगळ्या जगाचा अनुभव घ्यायचाय तर हवाई आयलँडला भेट देणं तुमच्यासाठी उत्तम ठरेल. निळेशार आकाश, शांत वातावरण आणि समुद्रकिनारी सूर्यास्ताचा रोमँटिक फिल हे सर्वच तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येईल. इथे तुम्हाला सक्रिय ज्वालामुखीदेखील पाहायला मिळेल.

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

बहामास

जर तुमचे बजेट मोठे असेल तुम्ही कॅरिबियन देशातील बहामास या ठिकाणाची निवड करु शकता. हो ठिकाण अन्य देशांहून थोड महाग आहे पण हनिमूनचा बेस्ट अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. सनबाथसाठी येथील समुद्रकिनारे फार फेमस आहेत. इथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हार्बर आयलंड, पिग बीच आणि पॅराडाईज आयलंडला भेट देऊ शकता.

Web Title: Best international honeymoon destinations romantic places for couples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
1

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
2

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
3

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
4

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.