
Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास
Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
सतीचे आभूषण पडले
देवा विशालाक्षी मंदिराशी जोडलेली प्रचलित मान्यता म्हणजे देवी सतीसंबंधित लोकप्रिय कथा. हिंदू पाैराणिक कथेनुसार, राजा दक्षच्या यज्ञात देवी सतीने आपले प्राण त्यागले होते. यानंतर भगवान शंकर सतीचे शरीर घेऊन सगळीकडे संचार करू लागले. मान्यतेनुसार, भगवान विष्णुने सृष्टीतील संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि हे तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तीपीठ तयार झाले. यातीलच देवीचे आभूषण ज्या ठिकाणी पडले तिथे आज देवी विशालाक्षीचे मंदिर पाहायला मिळते. तिला मणिकर्णी देवी म्हणूनही ओळखले जाते.
मंदिराच्या नावामागची खासियत
धार्मिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या कानातील मणीजडीत आभूषण या ठिकाणी पडले ज्यामुळे तिला मणिकर्णी या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या गर्भगृहात विशालाक्षी देवीची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. इथे भैरव रुपात देवीचे पूजा केली जाते. मंदिरातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथली प्राचीन वास्तुकला. काशीच्या प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये, हे मंदिर दक्षिण भारतीय मंदिर शैलीचे प्रतिबिंब दर्शवते.
Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?
कुठे आहे मंदिर?
देवी विशालाक्षी मंदिर वाराणसीच्या लाहोरी टोला भागातील मीर घाटाजवळ वसले आहे. भाविक इथे मंदिराच्या दर्शनासह काशी विश्वनाथ मंदिराला आणि काल भैरव मंदिरालाही भेट देतात. काशीच्या अरुंद गल्ल्या, प्राचीन घाट आणि मंदिरांच्या परंपरा या तीर्थयात्रेला खास बनवतात.
Ans: विशालाक्षी मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे मीर घाटाजवळ, लाहोरी टोला परिसरात आहे.
Ans: या मंदिराची गणना ५१ शक्तीपीठांमध्ये केली जाते. येथे देवी विशालाक्षीची शक्तीस्वरूपात पूजा केली जाते.
Ans: पौराणिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या कानातील मणीजडित आभूषण या ठिकाणी पडले होते. त्यामुळे या देवीचा मणिकर्णी देवीशीही संबंध जोडला जातो.