Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

हिवाळ्यात बर्फाच्छादित पर्वत, थंड हवा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर शिमला-मनालीशिवायही भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत. कुटुंबासोबत शांततेत फिरण्यासाठी ही ठिकाणे तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की समाविष्ट करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 08:05 AM
इथे पसरलीये बर्फाची चादर... यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

इथे पसरलीये बर्फाची चादर... यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

Follow Us
Follow Us:
  • हिमाचल प्रदेशातील चितकुल आणि कल्पा ही निसर्गसौंदर्याने नटलेली सुंदर ठिकाणे आहेत.
  • उत्तराखंडमधील मुनस्यारी येथे हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
  • अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि मेचुका येथे बर्फासोबतच बौद्ध मठ, सुंदर दऱ्या आणि साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो.
हिवाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी किंवा बर्फाच्छादित प्रदेशात फिरण्याची मजाच काही वेगळी असते. बर्फाने भरलेला परिसर, थंड वातावरण आणि अनेक निरनिराळ्या एक्टीव्हिटीज यामुळे ट्रिपची मजा द्विगुणित होते. हिवाळ्यात बहुतेकजण फिरण्यासाठी शिमला-मनालीसारख्या ठिकाणांची निवड करतात पण तुम्हाला ठाऊक आहे का? याहून सुंदर ठिकाणे भारतात आहेत ज्यांना तुम्ही कुटुंबासोबत भेट देऊ शकता. मुख्य म्हणजे शिमला-मनालीसारखी भरपूर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाही ज्यामुळे शांततेत, गजबटाशिवाय तुम्ही तुमची ट्रिप एन्जाॅय करु शकता.

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

चितकुल, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात चितकुल नावाचे एक सुंदर गाव आहे. या गावाचे साैंदर्य इतके सुंदर आणि अद्भूत आहे की यापुढे शिमला-मनालीही फेल आहे. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भारत-तिबेट सीमेच्या अगदी टोकाला वसलेले आहे. इथे लाकडाची जुनी घरे तुम्हाला पाहयला मिळतील. तसेच पर्वतातून वाहणारी बस्पा नदीकिनारी तुम्हाला शांत आणि चांगला वेळ घालवता येऊ शकतो.

कल्पा, हिमाचल प्रदेश

शिमलापासून 260 किलोमीटर अंतरावर कल्पा वसले आहे. सांगितले जाते की, १९ व्या शतकात लाॅर्ड डलहाैजीच्या यात्रेनंतर लोकांमध्ये या ठिकाणाची प्रसिद्धी वाढली. या ठिकाणाहून भगवान शिवाचे हिवाळी निवासस्थान असलेल्या किन्नर कैलास पर्वतरांगेचे सुंदर दृश्यही दिसते. जर तुम्ही हिवाळ्यात निसर्गाने नटलेल्या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.

मुनस्यारी, उत्तराखंड

उत्तराखंडचे काश्मीर म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते. इथे बर्फाची सुंदर चादर पसरल्याचे दिसते, हिवाळ्यात भेट देण्यासाठी हे ठिकाण एक परफेक्ट पर्याय आहे. पिथोरगड जिल्ह्यात अंदाजे २,२०० ते २,३०० मीटर उंचीवर मुनस्यारी वसले आहे. इथे तुम्हाला हिमालयातील पाच शिखरांचे विहंगम दृष्य पाहायला मिळेल.

तवांग, अरुणाचल प्रदेश

समुद्रसपाटीपासून साधारण 10,000 फूट उंचावर हे ठिकाण वसले आहे. इथे जगातील दुसरा आणि भारतातील पहिला सर्वात मोठा बाैद्ध मठ वसलेला आहे. तथापि, लक्षात घ्या, तवांगमध्ये बर्फाळ वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे इनर लाइन परमिट असणे अनिवार्य आहे.

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

मेचुका, अरुणाचल प्रदेश

हिवाळ्यात तुम्ही अरुणाचल प्रदेशातील मेचुका या ठिकाणालाही भेट देऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, मेचुकापासून साधारण 29–30 किलोमीटर अंतरावर मॅकमोहन रेषा आहे. इथे तुम्हाला हिरवाई, पांढऱ्या बर्फाच्छादित पर्वतांचे शिखर, वाहणाऱ्या नद्या आणि सुंदर दऱ्या पाहायला मिळतील. २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान इथे दरवर्षी ‘अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅट मेचुका’ नावाचा तीन दिवसीय क्रिडा उत्सव सुरु होतो. यात साहसी खेळ खेळले जातात.

 

Web Title: Winter travel destinations india chitkul kalpa munsiyari tawang mechuka snowy places nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • Winter News

संबंधित बातम्या

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
1

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो
2

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
3

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?
4

जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.