
काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
वजन वाढण्याची कारणे
मनुका खाण्याची योग्य पद्धत
वजन नियत्रंणात ठेवण्यासाठी उपाय
Black Raisins: वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात विविध पदार्थांचा समावेश केला जातो. शरीरावर चरबीचे अनावश्यक थर जमा होण्यास सुरुवात होते. रोजच्या आहारात सतत तिखट, मसालेदार, जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे वजन वाढण्यासोबतच गंभीर आजारांची शरीराला लागण सुद्धा होते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य तो डाएट करुन वाढलेले वजन कमी करावे. गोड खाण्याची इच्छा झाल्यानंतर बऱ्याचदा मिठाई, बिस्किटे किंवा इतर प्रक्रिया केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण त्या्ऐवजी थोड्या मनुका खाव्यात. इतर पदार्थांच्या तुलनेत काळ्या मनुक्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.(फोटो सौजन्य – istock)
रोजच्या आहारात मनुक्यांचा समावेश केल्यास शरीराचे वजन, बीएमआय व कंबरेचा घेर कमी होण्यास मदत होईल. मनुका थेट वजन कमी करत नाहीत, मनुक्यांच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. मनुका खाण्याचा एकमेव महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातील तंतू आणि गोड चव. मनुका खाल्यामुळे गोड पदार्थ खाण्याची ईच्छा पूर्ण होते. त्यामुळे वजन कमी करताना केवळ मनुके नाहीतर आहार, व्यायाम, झोप आणि कॅलरीचे प्रमाण सुद्धा योग्य असणे फार महत्वाचे आहे.
काळ्या मनुका भिजवून खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये प्रचलित आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात काळ्या मनुका भिजत घालुन ठेवाव्यात. भिजवल्यामुळे मनुका मऊ होतात आणि सहज चावून खाणे व पचवणे सोपे होऊन जाते. भिजवल्यामुळे मनुकांमधील पोषक घटक वाढतात. याशिवाय भिजवलेल्या मनुकांचे पाणी फेकून देता, उपाशी पोटी प्यावेत. पण मनुकांमधील बहुतांश पोषक घटक पाण्यात सहज विरघळत नाहीत. त्यामुळे मनुक्यांच्या पाण्यासोबतच भिजवून ठेवलेल्या मनुकासुद्धा खाव्यात. यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसतात.
वजन कमी करण्यासाठी मनुका खाताना प्रमाणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सुकवलेल्या फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि ऊर्जा एकवटलेली असते. अतिप्रमाणात गोड खाल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. २६ ग्रॅम मनुकांमध्ये ७८ कॅलरी आणि जवळपास १७ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. हे प्रमाण शरीरासाठी योग्य आहे. पण वांरवांर मूठभर मनुका खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही.
भिजवलेले मनुके सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळेत खाऊ शकता. भिजवलेल्या मनुकांसोबतच काजू-बदाम किंवा दही यांसारखा प्रथिनयुक्त पदार्थ सुद्धा नाश्त्यात खाऊ शकता. यामुळे अल्पोपहार अधिक संतुलित होण्यास मदत होईल. वजन कमी करायचे म्हणून खात असलेले पदार्थ प्रामुख्याने सकाळी रिकाम्यपोटी खाणे जास्त फायदेशीर ठरेल.