ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा 'हे' बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
मूळव्याध होण्याची कारणे?
बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय?
मूळव्याध झाल्यास कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
Piles Remedies: दैंनदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कायमच तिखट, तेलकट, अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. भारतामध्ये मूळव्याधीच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मूळव्याध झाल्यानंतर लगेच शस्त्रक्रिया केली जाते. पण त्याऐवजी आहारात बदल, फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी, बद्धकोष्ठता टाळणे आणि शौचाच्या सवयी सुधारल्यास मूळव्याधापासून आराम मिळू शकतो. मूळव्याध हा वेदनादायी आजार असल्यामुळे लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वाराच्या आत किंवा बाहेर सुजलेल्या गाठी तयार होतात. (फोटो सौजन्य – istock)
मूळव्याधीचे दोन प्रकार आहेत. अंतर्गत मूळव्याध, ज्यामुळे गुठळ्या गुदाशयाच्या आतमध्ये तयार होऊन कमी वेदना होतात. हा मूळव्याध झाल्यानंतर आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान रक्तस्त्राव होते. तर बाह्य मूळव्याध गुदाशय बाहेरील त्वचेखाली तयार होतो आणि वेदनादायी असतो. त्यामुळे झाल्यानंतर अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. वेळेवर आणि सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास ऑपरेशनची अजिबात आवश्यकता भासणार नाही. चला तर जाणून घेऊया मूळव्याध होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या बदलांचा शरीरावर कोणता परिणाम दिसून येतो? याबद्दल सविस्तर माहिती.
बद्धकोष्ठता, गर्भधारणा, लठ्ठपणा, बराच वेळ बसणे, अन्नात फायबरची कमतरता, कमी पाणी पाण्याचे सेवन केल्यामुळे मूळव्याध वाढण्याची शक्यता असते. ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून न गेल्यामुळे पचनक्रिया बिघाडण्यासोबतच आतड्यांमध्ये गाठी तयार होतात. यामुळे आतडयांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. मूळव्याधीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे.
मूळव्याध झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. योग्य आहार, फायबर, भरपूर पाणी इत्यादी सवींयमध्ये बदल करणेे गरजेचे आहे. तिखट, मसालेदार अन्न आणि बाहेरचे जंक फूड अजिबात खाऊ नये. रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचा समावेश, फळे, भाज्या सलाड, मोड आलेली कडधान्ये पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीराला पोषण देतात आणि पचनक्रिया निरोगी ठेवतात.






