दाताच्या हिरड्यांमधून वारंवार रक्त येतं? आरोग्यासंबंधित असू शकतात 'हे' गंभीर आजार
शरीरातील सर्वच अवयवांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. कारण शरीरातील एक अवयवाला इजा झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे येतात. त्यामुळे नेहमीच आरोग्याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. दात दुखणे, दातांमधून वारंवार होणारा रक्तस्त्राव, हिरड्यांमधील वेदना, सूज इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर घरगुती उपाय करून आराम मिळवा जातो. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर दात घासताना दातांमधून रक्त येऊ लागते. दातांमधून रक्त आल्यानंतर हिरड्यांना त्रास होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या ‘या’ अवयवांना मिळते भरपूर पोषण, हृद्य राहील कायम निरोगी
दात घासताना दातांमधून सतत रक्त येत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. यामुळे दातांसंबंधित समस्या आणखीन न वाढता तात्काळ आराम मिळवता येईल. दात घासताना हिरड्यांमधून येणारे रक्त धोक्याचे मानले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दात घासताना हिरड्यांमधून येणारे रक्त कोणत्या आजारांची लक्षणे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बऱ्याचदा हिरड्यांना सूज आल्यानंतर जास्त लक्ष दिले जात नाही. पण असे न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. दातांवर जमा झालेल्या प्लेक आणि बॅक्टेरियामुळे किंवा दातांमध्ये वाढलेल्या इन्फेक्शनमुळे हिरड्यांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. दात घासताना सूज किंवा रक्त आल्यास उपचार न केल्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हिरड्यांना आलेली सूज पेरिओडोंटायटीस सारख्या गंभीर आजारामुळे सुद्धा येऊ शकते. यामुळे तोंडातील जबड्याला आणि हिरड्यांना त्रास होण्याची शक्यता असते. जबड्याचे हाड वारंवार दुखी लागते. यामुळे दात कमकुवत होऊन जातात. त्यामुळे हिरड्यांमधून सतत येणार रक्त, तोंडाची दुर्गंधी येणे, दात सैल होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.
शरीरात सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हिरड्यांमधून किंवा दातांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. हा त्रास प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त दिसून येतो. गर्भधारणेदरम्यान, मासिक पाळी किंवा रजोनिवृत्ती दरम्यान महिलांच्या हिरड्यांना सूज येते आणि दातांमधून रक्त येऊ लागते.
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित विटामिन युक्त पदार्थांचे सेवन करावे. विटामिन सी आणि विटामिन के कमी झाल्यानंतर हिरड्यांमधून वारंवार रक्त येऊ लागते. याशिवाय विटामिनच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार सुद्धा होऊ शकतो, ज्यामुळे दात सैल होतात.