बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सुकलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्यातील अनेकांना बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सतत जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, कामाच्या वाढलेल्या तणावामुळे शरीराला हानी पोहचते. शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे पचनक्रिया बिघडण, गॅस होणे, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक योग्य वेळी बाहेर पडून न गेल्यामुळे शरीराला कोणत्याही आजारांची लागण होते. त्यामुळे नेहमी पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर पॉट स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यास सतत उलट्या, मळमळ वाटू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
किडनी फेल झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात ‘हे’ गंभीर बदल, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला
शरीरात वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यास जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता शरीरासाठी आवश्यक असलेली जीवनशैली फॉलो करावी. बद्धकोष्ठतेमुळे बऱ्याचदा आतड्यांमध्ये मल तसाच साचून राहतो. ज्यामुळे सतत पोटात दुखणे किंवा पोटात वेदना होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी शरीरात कोणते बदल करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीर कायम हायड्रेट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला कोणतीही इजा होत नाही. मात्र शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर बिघडून जाते. पाण्याचे भरपूर सेवन केल्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि अपचन इत्यादी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. हिंग पचनासाठी अतिशय महत्वाचे आहे. हिंगाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. यामुळे जेवणाची सुगंध वाढतो. हिंग शरीराच्या कान्याकोपऱ्यात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे आहारात तुम्ही पपई, सफरचंद, संत्री, नाशपाती, पेरू, किवी, मनुका आणि लिंबू इत्यादी फळांचे सेवन करू शकता. या फळांमध्ये भरपूर फायबर असते.