Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes: गोड खात नाही, तरीही शुगर लेव्हल वाढतेय? डायबिटीज कंट्रोलसाठी रोजच्या ‘या’ चुका टाळा

Healthy Habits To Control Blood Sugar level Diabetes: साखर न खाताही रक्तातील सारखरेचे प्रमाण वाढतंय, डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी दररोजच्या रुटीनमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 07:17 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • डायबिटीजचा धोका फक्त साखरेमुळे नाही
  • ‘या’ चुका वाढवू शकतात ब्लड शुगर
  • शुगर नियंत्रणासाठी ‘या’ सवयी महत्त्वाच्या
Diabetes: आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. हा फक्त ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा आजार नाही. तर , याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डायबिटीज हा वृद्धांचा आजार मानला जायचा. परंतु, आता तरुण लोकांनाही डायबिटीजची समस्या होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीव्यतिरिक्त, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव हे घटकही या समस्येस कारणीभूत ठरत आहेत.

आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (IDF) मते, जगभरात अंदाजे ५८९ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास हृदय, किडनी, डोळे आणि मज्जातंतूंना नुकसान पोहोचू शकते. लोकांना अनेकदा असे वाटते की केवळ जास्त साखर खाल्ल्यानेच रक्तातील साखरेची पातळी वाढते, परंतु काही दैनंदिन सवयींचाही त्यावर परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखर वाढण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, जाणून घेऊयात.

Protein Side Effects: जास्त प्रोटीन म्हणजे जास्त ताकद? हेल्दी डाएटचा किडनीवर होतोय परिणाम? अति सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या

रक्तातील साखर कशी वाढते?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे पचनक्रियेदरम्यान ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात, जे रक्ताद्वारे शरीराच्या विविध भागांत पोहोचते. स्वादुपिंडातून रिलीज होणारा इन्सुलिन हे हार्मोन, ग्लुकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यास मदत करते, जिथे त्याचा उपयोग ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो. पण जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी त्याचा योग्य वापर करू शकत नाहीत, तेव्हा रक्तात ग्लुकोज जमा होते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

सतत तणावाखाली असणंही धोकादायक?

कामाचा ताण आणि कौटुंबिक समस्यांचाही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. तणावाच्या काळात, शरीर कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारखे हार्मोन्स रिलीज करते. यामुळे लिव्हरमध्ये ग्लुकोजचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. दीर्घकाळच्या तणावामुळे इन्सुलिन रेझिझटेन्सचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे आपल्या दिनचर्येत योग, ध्यान आणि नियमित व्यायामाचा समावेश करा.

झोप पूर्ण न होणे

दिवसातून सात तासांपेक्षा कमी झोपल्याने तुमच्या रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होतो आणि इन्सुलिन रेझिझटेन्सचा धोका वाढू शकतो. चांगली झोप शरीराचे जैविक घड्याळ, म्हणजेच सर्केडियन रिदम, संतुलित ठेवण्यास मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन आणि कॉर्टिसोलसारख्या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. यामुळे गोड आणि उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा देखील वाढते, ज्यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

शुगर लेव्हल वाढण्यासाठी या गोष्टीही जबाबदार

वजन कमी करण्यासाठी उपवास करणे जसे की इंटरमिटेंट फास्टिंग अधिक लोकप्रिय झाले आहे. परंतु ते प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. दीर्घकाळ उपवास केल्याने कॉर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होऊ शकतात. हे हार्मोन्स यकृताला अधिक ग्लुकोज तयार करण्यास प्रवृत्त करतात, ज्यामुळे काही लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

रात्री उशिरा जेवणे आणि जेवणानंतर लगेच झोपणे याचाही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. दिवसाच्या तुलनेत रात्री शरीराची इन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी असू शकते. त्यामुळे, रात्री उशिरा जड जेवण केल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Stress Affects: रोजची चिंता, चिडचिड अन् निद्रानाश! सततच्या तणावामुळे फक्त मेंदूच नाही, तर संपूर्ण शरीरावर होतो परिणाम; जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: साखर न खाताही ब्लड शुगर वाढू शकते का?

    Ans: तणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या आहारामुळे शुगर वाढू शकते.

  • Que: तणावामुळे शुगर लेव्हल वाढते का?

    Ans: तणावामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढून ब्लड शुगरवर परिणाम होतो.

  • Que: रात्री उशिरा जेवल्याने शुगर वाढते का?

    Ans: रात्री उशिरा जड जेवण केल्याने शुगर वाढू शकते.

Web Title: Diabetes control tips bad habits that increase blood sugar level pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • diabetes
  • home remedies for Diabetes
  • world diabetes day

संबंधित बातम्या

World Diabetes Day: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील उपयुक्त, अन्यथा वाढेल मधुमेह
1

World Diabetes Day: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील उपयुक्त, अन्यथा वाढेल मधुमेह

Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी चालावे की रात्री, तज्ज्ञांचा खुलासा
2

Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी चालावे की रात्री, तज्ज्ञांचा खुलासा

World Diabetes Day 2026: मुलांनाही होऊ शकतो मधुमेह, सुरूवातीच्या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर
3

World Diabetes Day 2026: मुलांनाही होऊ शकतो मधुमेह, सुरूवातीच्या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका
4

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.