
World Diabetes Day: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील उपयुक्त, अन्यथा वाढेल मधुमेह
World Diabetes Day: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. बऱ्याचदा रक्तातील साखर वाढल्यानंतर कोणतीही गंभीर लक्षणे दिसून येत नाही. शरीरावर झालेली एखादी छोटीशी जखम किंवा फोड लवकर बरी न होणे, अचानक चक्कर येणे किंवा वारंवार लघवीला जावे लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण होतो. रक्तातील अतिरिक्त साखर मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकण्यासाठी शरीराला जास्तीची मेहनत करावी लागते. यामुळे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी वारंवार लघवी होऊन सतत तहान लागते.(फोटो सौजन्य – istock)
रक्तातील साखर पेशींपर्यंत ऊर्जेच्या स्वरूपात पोहोचत नसल्यामुळे खाल्ल्यानंतर काही तासांमध्येच खूप जास्त भूक लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दृष्टी अंधुक होणे, मज्जातंतूंवर परिणाम, हातापायांची बोटे सुन्न पडणे, रक्तप्रवाहावर परिणाम, त्वचा, हिरड्या किंवा लघवीच्या जागी बुरशीजन्य संसर्ग, मान, काख किंवा कोपऱ्याची त्वचा काळी पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आहारात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास मधुमेहाचा धोका कमी होईल.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ अतिशय प्रभावी आहे. डॉक्टरसुद्धा जांभूळ खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा जांभूळ रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. घरगुती उपाय करण्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेल्या गोळ्या औषधांचे सुद्धा सेवन करावे.
मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. या दाण्यांमध्ये असलेले विरघळणारे फायबर पचनाची प्रक्रिया मंदावण्यास आणि जेवणानंतर रक्तातील साखर वेगाने वाढू न देणारे घटक असतात. त्यामुळे आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे घालून पाणी रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर पाणी उपाशी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
पालेभाज्या सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक असतात. दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत.
Ans: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, ओट्स, संपूर्ण धान्ये, बिया आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
Ans: सफरचंद, पेरू, संत्री, पपई आणि बेरी यांसारखी फळे योग्य प्रमाणात खाऊ शकता. फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते.
Ans: मिठाई, साखरयुक्त पेये, बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. अतिरिक्त साखरेचे सेवन टाळावे.