क्तातील साखर होईल कायमची गायब! रोजच्या आहारात करा' या' रसाचे सेवन
बदलेली जीवनशैली, सतत आहारात होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, कामाचा तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हल्ली जगभरात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. रक्तातील साखर वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात सतत बदल करून दुर्लक्ष करू नये. जगभरात १५ कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. याशिवाय अनेक लोक वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन अवलंबून आहेत. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा लवंगचे सेवन, कायम दिसाल फिट आणि स्लिम
मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. येणाऱ्या पुढील काळात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात करून चयापचय सुधारतात. आज आम्ही तुम्हाला मधुमेह झल्यानंतर कांद्याच्या रसाचे कसे करावे? यामुळे शरीराला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कांदा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. दैनंदिन आहारात कांद्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला फायदे होतात. कांद्याच्या रसात ‘एलियम सेपा’ नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या रसाचे सेवन करावे. कांद्याचे सेवन केल्यामुळे शरीरावर कोणताही घातक परिणाम दिसून येत नाही.
जेवण बनवताना सर्वच घरांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांदा टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि चवसुद्धा वाढते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आहारात तुम्ही कच्चा कांदा किंवा कांद्याच्या रसाचे सेवन करावे., वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या रसाचे सेवन करावे.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते:
शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या रसाचे सेवन करावे. अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात., हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कांद्याचा आहारात समावेश करा.