शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा लवंगचे सेवन
सतत आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, शारीरिक हालचालींचा अभाव, शरीरात होणारे हार्मोनल बदल इत्यादी अनेक कारणांमुळे महिलांसह पुरुषांचे सुद्धा वजन वाढू लागते. वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वजन वाढल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र हळूहळू प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढल्यानंतर बसताना किंवा वर उठताना अनेक समस्या उद्भवू लागतात. आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा शरीराचे वजन कमी होत नाही. जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रोटीनशेकचे सेवन करतात. मात्र वारंवार प्रोटीनशेकचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना लवंगचे सेवन कसे करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे मसाले उपलब्ध असतात. त्यामुळे लवंग हा मसाल्यातील प्रकार मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आयुर्वेदामध्ये लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये असलेले गुणधर्म पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीराचे चयापचय सुधारते. लवंगमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकतात आणि शरीराला योग्य पोषण देतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर लवंगच्या चहाचे सेवन करू शकता. या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. लवंगचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम,टोपात पाणी गरम करून त्यात लवंग टाकून उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी गाळून त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून नियमित सेवन करावे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन जाईल.
मसाल्यांच्या पदार्थांमध्ये लवंग आणि दालचिनीचा वापर भरपूर प्रमाणात केला केला जातो. टोपात पाणी गरम करून त्यात लवंग दालचिनीचे तुकडे टाकून गरम करून घ्या. तयार केलेल्या लिंबू टाकून मिक्स करा. उपाशी पोटी या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लवंग दालचिनीचे पाणी अतिशय प्रभावी ठरेल.