बोनी कपूरचे कमालीचे वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बोनी कपूर यांनी त्यांच्या अविश्वसनीय वजन कमी करण्याच्या प्रवासाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेक हिट बॉलीवूड चित्रपटांचे निर्माते बोनी कपूर आता आपल्या वजन कमी केलेल्या नव्या अवतारातून चर्चेत आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्लिम आणि फिट कपूरचे फोटो व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांच्या आकर्षक लुकचे कौतुक करणे थांबवू शकत नाहीत.
यामधील सर्वात मोठे आश्चर्य काय आहे माहीत आहे का? बोनी कपूर जिमला अजिबात गेले नाहीत. त्याऐवजी, त्यांनी निरोगी आहारावर लक्ष केंद्रित करणारी एक साधी दिनचर्या पाळली आणि त्याचे परिणाम आता त्यांच्या शरीरातील बदलावर दिसत आहेत. बोनी कपूरच्या नवीन लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे कॅज्युअल आणि सेमी-फॉरमॅचल पोशाखातील बोनी कपूरचे फोटो इंटरनेटवर फिरत आहेत. चाहते त्याचा स्टायलिश आणि फ्रेश लुक खूप पसंत करत आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक केले, तर काहींना त्याने इतका मोठा बदल कसा केला हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.BollywoodShaadis मधील वृत्तानुसार, कपूरने एकूण २६ किलो वजन कमी केले आहे. आणि त्याने हे सर्व जिमला न जाता केले, जाणून घ्या नक्की कसे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
बोनी कपूरने घेतला योग्य आहार
त्यांच्या परिवर्तनाचे श्रेय ते शिस्तबद्ध आहाराला देतात, ज्यामध्ये रात्रीचे जेवण वगळणे, सूप पिणे आणि नाश्त्यात फळांचा रस आणि ज्वारीची रोटी यांचा समावेश आहे. बोनी कपूरच्या म्हणण्यानुसार, दिवंगत पत्नी श्रीदेवीने त्यांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रेरित केले.
याचे संपूर्ण रहस्य म्हणजे केवळ शिस्त आणि आहारावर नियंत्रण असेही त्यांनी सांगितले आहे. तसंच अत्यंत साधा आहार आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळेच हे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
कोणताही फॅन्सी फिटनेस प्लॅन नाही
कोणत्याही प्रकारचा व्यायाम नाही, जिम नाही, फक्त समर्पण आणि साधा आणि सात्विक आहार हेच वजन कमी होण्यामागील रहस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रेरणादायी म्हणजे त्याने कोणताही फॅन्सी फिटनेस प्लॅन पाळला नाही. हे सर्व त्याच्या साध्या सवयी आणि इच्छाशक्तीचे परिणाम आहे.
श्रीदेवीला दिले होते वचन
एका जुन्या मुलाखतीत, बोनी कपूरने उघड केले की त्यांची दिवंगत पत्नी, अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांना वजन कमी करण्यास कसे प्रेरित केले. एबीपी माझाशी बोलताना कपूर म्हणाले, “मला माझ्या पत्नीने (श्रीदेवी) सांगितलेली गोष्ट आठवत होती. ती म्हणाली की जर केसांचे काही करायचे असेल तर आधी वजन कमी करा. म्हणून मी वजन कमी केले.” श्रीदेवी नेहमीच त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे म्हणत असे.
Weight Loss: रोज 1-1 किलो वजन होईल कमी, Baba Ramdev यांनी पोट सपाट करण्यासाठी दिला जबरदस्त उपाय
श्रीदेवी-बोनीचे नातं
ती त्याला अनेकदा आठवण करून देत असे की जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा तो कसा दिसत होता. “जेव्हा मी तुला भेटले तेव्हा तू सडपातळ, उंच आणि देखणा होतास आणि आता तू फक्त…” ती म्हणायची. श्रीदेवीला दिलेल्या उत्तरात कपूर विनोदाने म्हणायचे की, ‘आता तू माझ्या आयुष्यात आली आहेस, तर मी आणखी काय मागू शकतो? जर मी सडपातळ आणि ट्रिम झालो तर बऱ्याच महिला माझ्याकडे आकर्षित होतील आणि मला ते घडू द्यायचे नाही.” आणि ती त्यावर म्हणायची, ‘हो, हो.'” याच भावनिक आठवणीने कपूरला तिच्या आरोग्य प्रवासाला सुरुवात करण्यास प्रेरित करण्यात मोठी भूमिका बजावली, असे त्यांनी स्पष्ट केले होते. गेल्या २-३ वर्षात त्यांनी २६ किलो वजन घटवले आहे आणि तरूण मुलांनाही प्रेरणा दिली आहे.