स्तनाचा कर्करोग कसा ओळखता येतो (फोटो सौजन्य - iStock)
देशभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र असे असूनही या कर्करोगाबाबत आजही जागरूकतेचा अभाव दिसून येतो. स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान एखाद्याचा अमूल्य जीव वाचवू शकतो. या कर्करोगाची लक्षणे जाणून घेतल्यास महिलांना वेळीच उपचार करण्यास आणि खूप उशीर होण्यापूर्वी वैद्यकीय मदत घेण्यास मदत होऊ शकते. डॉ. मधुलिका सिंग, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबात सविस्तर माहिती दिली आहे.
Breast Cancer पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी 5 उपाय, तज्ज्ञांचा सल्ला
ब्रेस्ट कॅन्सर सर्वात सामान्य
स्तनाचा कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. जेव्हा स्तनातील असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात, तेव्हा एक गाठ तयार होते आणि कर्करोगास सुरूवात होते. याचे नेमके कारण माहित नसले तरी, वय, अनुवंशिकता, हार्मोनल बदल, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा आणि रेडिएशन एक्सपोजर यासारखे घटक धोका वाढवू शकतात. यशस्वी उपचार आणि पुनर्प्राप्तीमध्ये वेळीच निदान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, म्हणूनच सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.
लक्षणांची माहिती नसल्यामुळे दुर्लक्ष
महिलांना या कर्करोगाच्या लक्षणांची फारशी माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष होते. महिलांनी त्यांच्या स्तनांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आणि कोणतेही असामान्य बदल आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांना कळवणे गरजेचे आहे. निदानास विलंब झाला तर स्तनाचा कर्करोग जवळच्या लिम्फ नोड्स किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की फुफ्फुसं, हाडं किंवा यकृतामध्ये पसरू शकतो. त्यामुळे थकवा, तीव्र वेदना आणि अगदी तणावासारखी लक्षणे उद्भवू शकतात. यामुळे महिलेच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. शिवाय, प्रगत टप्प्यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीची देखील आवश्यकता भासू शकते.
ही लक्षणे आढळल्यास करु नका दुर्लक्ष
महिलांनी दरमहा नियमितपणे स्वयं स्तन तपासणी करणे गरजेचे आहे आणि दरवर्षी नियमित स्तनांची वैद्यकिय तपासणी करावी, विशेषतः चाळीशीनंतर महिलांनी दरवर्षी स्तन तपासणी करावी आणि वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास वेळीच उपचार करावा