Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Breastfeeding Week : प्रत्येक स्तनपान फरक घडवून आणते! बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध का आहे ‘अमृत’? तज्ज्ञांनी दिली माहिती

स्तनपान प्रत्येक मुलाला आयुष्याची निरोगी सुरुवात करून देण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जन्माच्या पहिल्या तासात अधिक नवजात बालकांना स्तनपान दिले जाईल हे सुनिश्चित करण्यात भारताने आशादायक प्रगती केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 05:37 PM
प्रत्येक स्तनपान फरक घडवून आणते! बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध का आहे 'अमृत'? तज्ज्ञांनी दिली माहिती

प्रत्येक स्तनपान फरक घडवून आणते! बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध का आहे 'अमृत'? तज्ज्ञांनी दिली माहिती

Follow Us
Follow Us:

स्तनपान प्रत्येक मुलाला आयुष्याची निरोगी सुरुवात करून देण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जन्माच्या पहिल्या तासात अधिक नवजात बालकांना स्तनपान दिले जाईल हे सुनिश्चित करण्यात भारताने आशादायक प्रगती केली असली तरी, शिफारस केलेल्या पहिल्या सहा महिन्यांसाठी केवळ स्तनपान सुरू ठेवणे हे अजूनही आव्हान आहे. या तफावतीमधून मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या निदर्शनास येते, जी मातांना प्रसूती कक्ष सोडल्यानंतरही दीर्घकाळ सतत पाठबळ देण्याचे आवाहन करते.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील कंसल्टण्‍ट ऑब्स्टेट्रिशियन व ग्यानेकोलॉजिस्ट डॉ. मोलश्री मिश्रा म्हणाल्या, “स्तनपानाची लवकर सुरुवात ही केवळ सुरुवात आहे. मातांना अनेकदा स्तनपान करण्यामधील अडचणी, दुधाच्या पुरवठ्याबद्दल चिंता, मार्गदर्शनाचा अभाव, कौटुंबिक दबाव आणि कामावर परत जाण्याच्या मागण्यांचा सामना करावा लागतो. अधिक तान्ह्या मुलांना केवळ स्तनपानाचे पूर्ण फायदे मिळावेत असे आपल्याला वाटत असेल, तर हॉस्पिटलच्या पलीकडे जाऊन सतत पाठबळ देणे आवश्यक आहे.”

स्तनपानाची सुरुवात नैसर्गिक पहिल्या संरक्षणाने होते. स्तनपानाला सहसा तान्ह्या मुलांची पहिली लस का म्हटले जाते यामागे प्रबळ वैज्ञानिक कारण आहे. चिक किंवा चिकाचे दूध, ज्याला कोलोस्ट्रम म्हणून ओळखले जाते, ते अँटीबॉडीज, रोगप्रतिकारक पेशी आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असते, जे नवजात बालकांची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित होण्यापूर्वी त्यांना संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. ही नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती तान्ह्या मुलांना आयुष्याच्या सुरुवातीच्या आणि अत्यंत संवेदनशील दिवसांमध्ये महत्त्वाचा फायदा देते.

आईचे दूध केवळ पोषणापेक्षा खूप जास्त आहे. हा पोषक, गतिमान द्रव आहे, जो तान्ह्या मुलांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत स्वतःला जुळवून घेतो. तान्ही मुले वाढतात, तसतसे आईचे दूध पोषक घटक आणि रोगप्रतिकारक घटकांचे योग्य संतुलन प्रदान करण्यासाठी त्याचे प्रमाण नैसर्गिकरित्या समायोजित करते, जे निरोगी वाढ, मेंदूचा विकास आणि बालपणीच्या सामान्य आजारांपासून संरक्षणास पाठबळ देते.

अनेक माता सहा महिन्यांपूर्वीच स्तनपान का थांबवतात?

फायदे माहित असूनही, अनेक माता केवळ स्तनपान सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करतात. बाळाने दूध व्यवस्थित न घेण्याच्या अडचणी, दुधाच्या पुरवठ्याबद्दल चिंता, शारीरिक थकवा, खूप लवकर पाणी किंवा फॉर्म्युला मिल्क सुरू करण्याबाबत गैरसमज, अपुरे कौटुंबिक पाठबळ आणि मातृत्व रजेनंतर कामाच्या ठिकाणी मर्यादांमुळे अनेकदा स्तनपान टिकवून ठेवणे आव्हानात्मक होते. स्तनपान केवळ आईची एकटीची जबाबदारी नाही. आरोग्यसेवा व्यावसायिकांचे सतत मार्गदर्शन आणि कुटुंबातील सदस्यांचे प्रोत्साहन मातांना सुरुवातीचे महिने आत्मविश्वासाने पार पाडण्यास मदत करण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.

स्तनपान-अनुकूल परिसंस्थेची उभारणी

जनजागृती करण्याइतकेच अनुकूल वातावरण निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. मूल झाल्यानंतर सतत लॅक्टेशन कौन्सिलिंग (स्तनपान समुपदेशन) आणि व्यावहारिक स्तनपान मार्गदर्शन मातांना सामान्य आव्हानांवर मात करण्यास आणि त्यांच्या स्तनपानाच्या प्रवासात आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करू शकते. कुटुंबं भावनिक प्रोत्साहन देऊ शकतात आणि संगोपनाची जबाबदारी वाटून घेऊ शकतात, तर सामुदायिक उपक्रम सतत मार्गदर्शन प्रदान करू शकतात.

प्रत्येक स्तनपान फरक घडवून आणते

पहिल्या सहा महिन्यांसाठी केवळ स्तनपान पूर्ण पोषण देते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि अतिसार, श्वसन संसर्ग व बालपणीच्या इतर अनेक आजारांचा धोका कमी करते. मातांसाठी, स्तनपान प्रसूतीनंतर रिकव्हरीला पाठबळ देते आणि त्याचा संबंध स्तनांचा व अंडाशयाचा कर्करोग, टाईप २ मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्कुलर आजाराचा धोका कमी होण्याशी जोडला गेला आहे. फरक घडवून आणण्यासाठी स्तनपान परिपूर्ण असणे आवश्यक नाही हे लक्षात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही मातांना वैद्यकीय किंवा वैयक्तिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांची केवळ स्तनपान देण्याची क्षमता मर्यादित होते. पण, प्रत्येक वेळी स्तनपान मौल्यवान पोषण आणि रोगप्रतिकारक संरक्षण प्रदान करते आणि प्रत्येक प्रयत्नाला टीका करण्याऐवजी पाठबळ मिळणे योग्य आहे.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विद्या बालनचा खास संदेश; भारतीय विणकरांच्या कलेला दिला मनापासून सलाम

पुढील वाटचाल

भारताचा स्तनपानाचा प्रवास पहिल्या स्तनपानाने संपू नये. आता सुरुवातीला प्रोत्साहन देण्यासोबत आरोग्यसेवा यंत्रणा, कुटुंबं, समुदाय आणि कामाच्या ठिकाणांद्वारे सतत पाठबळ सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मातांना आवश्यक असलेले मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि अनुकूल वातावरण मिळते, तेव्हा अधिक बाळांना स्तनपान देणाऱ्या आजीवन पोषणाचा, विकासाचा आणि रोगप्रतिकारक फायद्यांचा लाभ मिळू शकतो.

Web Title: Breastfeeding is the simplest and most effective way to give every child a healthy start in life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • breastfeeding
  • pune news
  • world breastfeeding week

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.