
१५ मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! चमचाभर तांदळाच्या पिठाचा 'या' पद्धतीने करा वापर
तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होते. लग्नच्या दोन ते तीन महिने आधीपासून तयारी सुरु केली जाते. साड्या खरेदी, सुंदर सुंदर दागिने आणि इतरही अनेक वस्तू खरेदी केल्या जातात. लग्नात सुंदर दिसण्यासाठी मुली वेगवेगळ्या स्किन केअर ट्रीटमेंट, स्किन ग्लोइंग ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. ग्लोइंग त्वचेसाठी चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण जीवनशैलीतील बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, चुकीचे स्किन केअर इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि मोठे फोड आल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल किंवा क्लीनअप करतात. पण याचा कोणताच परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
सर्वच महिलांसह पुरुषसुद्धा घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावतात. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. मात्र मान, पाय, हातांकडे लक्ष दिले जाते.उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे शरीरावर टॅनिंग वाढते. यासोबतच प्रदूषण, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि असंतुलित आहार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम सुद्धा त्वचेवर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तांदळाचा फेसपॅक नियमित चेहऱ्यावर आणि मानेवर लावल्यास त्वचा उजळदार दिसेल.
कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात मैदा, दूध, मध आणि गुलाबपाणी एकत्र मिक्स करून फेसपॅक बनवा. तयार केलेला फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि टॅनिंग वाढलेल्या अवयवांवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर ५ मिनिटं मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून दोनदा तांदळाच्या पिठाचा फेसपॅक लावल्यास त्वचा उजळदार दिसेल.
तांदळाच्या पिठात व्हिटॅमिन बी, पेरुलिक ऍसिड, अॅलँटोइन आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचा उजळदार होते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणत्याही चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तांदळाच्या पिठाचा किंवा घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या कमी होतात आणि त्वचा उजळदार दिसते. तांदळाच्या पिठापासून बनवलेले फेस पॅक आणि स्क्रब आठवड्यातून दोनदा वापरल्यास त्वचा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग निघून जाईल.