झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'हा' गुणकारी पदार्थ! सकाळी उठल्यानंतर त्वचेवर येईल चमकदार ग्लो
जाड आयब्रो मिळवा! घरच्या घरी करा हे सोपे उपाय, परिणाम दिसतील फक्त 15 दिवसांत
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवते. याशिवाय त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवून देते. कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यामुळे कोलोजनचे उत्पादन सुधारते. वय वाढल्यानंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचेच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळते.
कोरफड जेलमध्ये विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. अँटीऑक्सिडेंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोरफड जेल त्वचा मॉईश्चराईज आणि चमकदार करते. तसेच जळजळ, पुळ्या, बारीक मुरूम इत्यादी सर्वच समस्या नष्ट होतात. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कँप्सूल किंवा थोडस खोबऱ्याचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली क्रीम बंद डब्यात भरून रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारेल आणि चेहरा चमकदार दिसेल.
रात्रीच्या वेळी कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मॉईश्चर होते. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे आणि इतर गुणधर्मांमुळे त्वचेमध्ये हायड्रेशन कायम टिकून राहते. त्वचा दीर्घकाळ हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी कोरफड जेल नियमित चेहऱ्यावर लावावे. रात्री कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यास जलद गतीने स्किन रिपेअर होते. याशिवाय सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊन त्वचेचा रंग उजळदार होतो. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी कोरफड जेल अत्यंत प्रभावी आहे.






