Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा पण चवदार असा गुजरातचा फेमस पदार्थ डाळ ढोकळी घरी बनवून पहा; चविष्ट रेसिपी नोट करा

तूर डाळ आणि गव्हाच्या पिठापासून तयार केला जाणारा डाळ ढोकळी हा गुजरातचा एक लोकप्रिय आणि चविष्ट असा पदार्थ आहे. गरमा गरम डाळ ढोकळीवर तूप टाकून त्याला खाल्ले जाते जे चवीला लाजवाब लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2025 | 02:10 PM
साधा पण चवदार असा गुजरातचा फेमस पदार्थ डाळ ढोकळी घरी बनवून पहा; चविष्ट रेसिपी नोट करा

साधा पण चवदार असा गुजरातचा फेमस पदार्थ डाळ ढोकळी घरी बनवून पहा; चविष्ट रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:

डाळ ढोकळी ही एक पारंपरिक गुजराती आणि मराठी पद्धतीने बनवली जाणारी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. गरमागरम डाळीमध्ये गहू पिठापासून तयार केलेल्या ढोकळ्या घालून ही भाजी बनवली जाते. यामध्ये गोडसर, तिखट आणि आंबट अशा तिन्ही चवांचा समावेश असल्यामुळे ही एक परिपूर्ण जेवणाची डिश मानली जाते. पोटभरीचा, चवदार आणि सोपा असा हा पदार्थ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अधिकतर बनवला जातो.

आषाढी एकादशी स्पेशल! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

अनेकदा असं होतं की आपल्याला साधं गरमा गरम जेवण जेवायची इच्छा असते. यावेळी अतितिखट आणि मसालेदार पदार्थ नको वाटतात. मूड स्विग्स कधीही बदलू शकतात आणि तुम्हाला साधे पण तितकीच रुचकर असे पदार्थ खायला आवडत असेल तर डाळ ढोकळी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला लगेच नोट करूया यासाठी यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

डाळीसाठी:

  • तूर डाळ – १ कप
  • टोमॅटो – १ (बारीक चिरलेला)
  • हिंग – १ चिमूट
  • हळद – ¼ चमचा
  • तिखट – ½ चमचा
  • गूळ – १ चमचा (ऐच्छिक)
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – १ चमचा
  • तेल/साजूक तूप – १ चमचा
  • मोहरी, जिरं – प्रत्येकी ½ चमचा
  • कढीपत्ता – काही पाने
  • आले आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट – १ चमचा
ढोकळीसाठी:
  • गव्हाचं पीठ – १ कप
  • हळद – ¼ चमचा
  • लाल तिखट – ½ चमचा
  • हिंग – १ चिमूट
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ चमचा
  • पाणी – मळण्यासाठी
जेवणाची मजा होईल द्विगुणित; एकदा घरी बनवून तर पहा लज्जतदार भरलेली शिमला मिरची

कृती

  • गुजराती स्टाईल डाळ ढोकळी तयार करण्यासाठी सर्वप्रथम तूर डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये २ वाट्या पाण्यात टोमॅटो, हळद, थोडं मीठ टाकून ३–४ शिट्ट्यांपर्यंत शिजवा.
  • नंतर ती मिक्सरमध्ये हलकीशी फिरवून किंवा घोट्याने घोटून घ्या.
  • गव्हाच्या पिठात हळद, तिखट, हिंग, मीठ, तेल टाकून थोडंसं कडकसर पीठ मळून घ्या.
    १५–२० मिनिटं झाकून ठेवा.
  • नंतर त्याचे लाटून पातळ पोळीसारखे करा आणि त्याचे लांबट किंवा चौकोनी तुकडे कापा.
  • एका भांड्यात तेल/तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आले-हिरवी मिरची पेस्ट टाका.
  • थोडं परतून घ्या आणि मग शिजवलेली डाळ त्यात ओता.
  • त्यात गूळ, लिंबाचा रस आणि थोडं पाणी टाका. उकळा येऊ द्या.
  • उकळणाऱ्या डाळीत तयार ढोकळीचे तुकडे एकेक करून घाला.
  • १०–१५ मिनिटं मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवा. मधूनमधून हलवत राहा जेणेकरून ढोकळी चिकटणार नाही.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • गरम गरम डाळ ढोकळी एका वाटीत घालून त्यावर तूप टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • डाळ थोडी सैलसर असावी, कारण ढोकळी शिजताना ती घट्ट होते.
  • तुम्ही त्यात शेंगदाण्याचा कूट किंवा कोथिंबीर मिक्स करताना थोडंसं किसलेलं नारळसुद्धा घालू शकता.
  • गरम गरम डाळ ढोकळी खमंग तुपासोबत सर्व्ह करा आणि तिच्या पारंपरिक चवाचा आस्वाद घ्या!

Web Title: Bring gujrat famous dal dhokali dish at your home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • food recipe
  • Gujrat
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.