Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या

Aspirin Medicine : आरोग्याच्या किरकोळ समस्या दूर करण्यासाठी ॲस्पिरिन गोळीचे प्रामुख्याने सेवन केले जाते. पण आम्ही तुम्हाला म्हटलो की, यामुळे कॅन्सरसारखा जीवघेणा धोका देखील कमी होऊ शकतो... तर तुमचा यावर विश्वास बसेल का?

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 25, 2026 | 08:15 PM
गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • काही विशेष रुग्णांवर दीर्घकाळ चाललेल्या संशोधनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले.
  • शस्त्रक्रियेनंतर दिलेल्या औषधोपचारांमुळे पुनरावृत्तीवर परिणाम दिसून आला.
  • औषधाचा वापर करताना फायदे-तोटे दोन्ही लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे.
ॲस्पिरिन ही एक सामान्य गोळी आहे जिचे बऱ्याचदा सेवन केले जाते. सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ किंवा संधिवात दूर करण्यासाठी याचे सेवन फायद्याचे ठरते. यामुळेच आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवू लागल्या की लोक या गोळीचे सेवन करु लागतात. पण सामान्य आजरांसाठी खाल्ली जाणारी ही गोळी कर्करोगाचाही आजार दूर कर शकते का? हा प्रश्न थोडा गोंधळात टाकणारा आहे. नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे ज्यानुसार ॲस्पिरिन वेदना कमी करत नाही तर काही प्रकरणात ती कर्करोगाचा धोका देखील कमी करण्यास आपली मदत करु शकते. चला संशोधनात नक्की कोणकोणत्या बाबी उघड झाल्या ते सविस्तर जाणून घेऊया.

Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण

संशोधनातून काय समोर आले

यासाठीचे सर्वात मोठे संशोधन जाॅन बर्न्स यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यांनी लिंच सिंड्रोम असलेल्या एका रुग्णावर मोठी चाचणी केली. लिंच सिंड्रोम ही एक अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामुळे लोकांना कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो. या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक ॲस्पिरिन गोळी घेत आहेत त्यांच्यात कर्करोगाचा धोका जवळपास निम्म्याने कमी झाला आहे. साधारण १० वर्षे चाललेल्या या चाचणीत ॲस्पिरिनचा ६०० मिग्रॅ डोस वापरण्यात आला आणि त्याचे परिणाम इतके प्रभावी होते की अनेक देशांमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यात आली. त्यानंतर ७५ ते १०० मिग्रॅ या कमी डोसचा वापर करून केलेल्या जेव्हा अभ्यासात तपासले गेले तेव्हा हे समोर आले की, कमी प्रमाणात ॲस्पिरिन घेतल्यानंतरही याचा प्रभाव तितकाच चांगला असू शकतो.

याप्रमाणेच स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये अ‍ॅना मार्टलिंग यांच्या नेतृत्वाखाली २,९८० रुग्णांवर रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल करण्यात आले होते. यात आढळून आले की, शस्त्रक्रियेनंतर दररोज अ‍ॅस्पिरिन घेणाऱ्या रुग्णांमध्ये कर्करोग पुन्हा होण्याचा धोका निम्म्याहून कमी झाला आहे. २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाने वैदकीय पद्धतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.

ॲस्पिरिन कसे काम करते

आता आपल्याला प्रश्न पडेल की, ॲस्पिरिन कर्करोगाला कमी करण्यास कसे मदत करते. तर याविषयी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या कर्करोग तज्ज्ञ रूथ लँगली यांनी सांगितले की, हे औषध शरीरातील विविध प्रकियांवर परिणाम करते ज्याचा संबंध कर्करोगाशी जोडलेला आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनानुसार, ॲस्पिरिन रक्त गोठण्यास मदत करणारे घटक कमी करू शकते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी रोगप्रतिकार प्रणालीसमोर उघड होतात आणि शरीर त्यांना ओळखून नष्ट करू शकते.

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

या गोष्टी लक्षात ठेवा

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ॲस्पिरिन काही जादुई उपाय नाही. याचे जसे आरोग्याला फायदे होतात त्याचप्रमाणे अतिसेवनाने याचे आरोग्याला नुकसान देखील होऊ शकते. अतिप्रमाणात ॲस्पिरिनचे सेवन केल्यास पोटात जळजळ, अल्सर किंवा अंतर्गत रक्तस्त्राव अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, ॲस्पिरिन कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते, परंतु त्याचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही. यामुळेच याचे सेवन करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Can aspirin reduce the risk of cancer new research the truth lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स
1

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल
2

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
3

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
4

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.