फोटो सौजन्य: iStock
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसात प्रत्येकाच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत असतात. तसेच अनेक जण डिहायड्रेट होत असतात. मग अशावेळी थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिणे आलेच. आता तर प्रत्येक घराघरात एसी देखील लागण्यास सुरुवात झाली आहे. पण हाच एसी किंवा थंडगार पाणी आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम देखील करू शकतो.
कडक आणि तापत्या उन्हात थंड पाणी पिण्याचा आणि गारगार एसीमध्ये राहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. यामुळे शरीराला काही काळ आराम मिळू शकतो परंतु दीर्घकाळात त्याचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. थंड पाणी पिणे आणि एअर कंडिशनरमध्ये राहणे हार्ट अटॅकचा धोका वाढवतो असे अनेक लोक मानतात. पण खरंच हृदयाला यामुळे धक्का बसू शकतो का? यात किती तथ्य आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
फिजिकल होण्यासाठी जोडीदार देतोय दबाव? नात्यासाठी असू शकते धोक्याचे संकेत
खूप थंड पाणी पिणे किंवा अचानक खूप थंड वातावरणात जाणे यामुळे आपल्या शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते. यामुळे शरीराला धक्का बसू शकतो आणि हृदयाच्या स्नायूंवर दबाव वाढू शकतो. हा धोका विशेषतः अशा लोकांमध्ये वाढतो ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित काही समस्या आहेत. ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयरोग आहे, वृद्ध, विशेषतः 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, जे धूम्रपान किंवा मद्यपान करतात अशा लोकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
थंड पाणी पिणेच टाळावे असे अजिबात नाहीये. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि थंड पाणी कमी प्रमाणात पित असाल किंवा एसी योग्य प्रमाणात वापरत असाल तर त्यात काहीही नुकसान नाही, परंतु अचानक शरीराला अति तापमानात नेणे, जसे की उष्णतेमध्ये धावल्यानंतर बर्फाचे थंड पाणी पिणे, हृदयावर परिणाम करू शकते.