Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शारीरिक संबंधांशिवाय Chlamydia होऊ शकतो का? नक्की काय आहे आजार, तज्ज्ञांचे मत

जर क्लेमायडियावर वेळेवर उपचार केले नाहीत तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. क्लेमायडिया आजार म्हणजे गुप्तांगात सतत दुखते अथवा डिस्चार्ज होते. हा आजार नक्की का होतो?

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 26, 2025 | 02:53 PM
क्लेमायडिया म्हणजे नक्की काय आहे आणि याचा शारीरिक संबंधाशिवाय शरीरावर काय परिणाम होतो (फोटो सौजन्य - iStock)

क्लेमायडिया म्हणजे नक्की काय आहे आणि याचा शारीरिक संबंधाशिवाय शरीरावर काय परिणाम होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

क्लेमायडिया हा एक सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) आहे, जो प्रामुख्याने क्लेमायडिया ट्रॅकोमॅटिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. क्लॅमिडीया प्रामुख्याने प्रजनन प्रणालीवर परिणाम करते. जर क्लेमायडियावर वेळेवर उपचार केले नाहीत तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. क्लेमायडियाचा संसर्ग बहुतेकदा लैंगिक संबंधांशी संबंधित असतो, परंतु लैंगिक संबंधाशिवाय तुम्हाला क्लेमायडियाचा संसर्ग होऊ शकतो का? असाही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. 

CMRI कोलकाता येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परनोमिता भट्टाचार्य म्हणतात की क्लेमायडिया हा एक जिवाणू संसर्ग आहे जो पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतो. हा संसर्ग प्रामुख्याने गुप्तांग आणि गुदाशयातून पसरतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, क्लॅमिडीया असुरक्षित संभोगामुळे होतो. म्हणूनच बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की क्लेमायडिया केवळ लैंगिक संबंधातून पसरू शकतो. पण हे १०० टक्के खरे नाही. कधीकधी पुरुष आणि स्त्रियांना लैंगिक संबंध न ठेवताही क्लेमायडियाचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock) 

शारीरिक संबंधाशिवाय काय आहेत कारणं

शारीरिक संबंधाशिवाय होऊ शकतो का

  • जोडीदाराला संसर्ग झाल्यामुळेः  जर एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगात आधीच क्लेमायडिया संसर्ग असेल आणि जोडीदार किंवा इतर कोणत्याही निरोगी व्यक्तीने त्या संसर्गाला स्पर्श केला तर क्लेमायडिया होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते
  • गोष्टी शेअर करूनः  डॉ. पराणमिता भट्टाचार्य म्हणतात की काही प्रकरणांमध्ये, संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले टॉवेल, अंडरवेअर किंवा बेडिंग शेअर केल्याने देखील सेक्स न करता क्लेमायडिया होऊ शकतो. इतकेच नाही तर घाणेरडे पाणी आणि संक्रमित साबणाच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते
  • गुदद्वारासंबंधीचे कनेक्शनः जरी जोडीदारांमध्ये लैंगिक संबंध आले नसले तरी, तोंडावाटे किंवा गुदद्वाराद्वारे संपर्क झाला असेल, जसे की चुंबन आणि ओरली शारीरिक संबंध ठेवले तरीही क्लेमायडिया संसर्ग होऊ शकतो. क्लेमायडिया संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यांना आणि नाकाला स्पर्श केल्यानेदेखील पसरतो. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ट्रॅकोमा म्हणतात
  • सेक्स टॉईजमुळे होणारा क्लेमायडियाः बऱ्याचदा शारीरिक संबंध ठेवताना पार्टनर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि सेक्स टॉय वापरतात. जर संभोगानंतर हे व्यवस्थित स्वच्छ केले नाही आणि पुन्हा वापरले तर त्यामुळे क्लेमायडिया होऊ शकतो.
  • गर्भधारणेदरम्यानः जर एखाद्या महिलेला गरोदरपणात क्लेमायडिया झाला असेल तर तो बाळाच्या डोळ्यांत आणि प्रसूतीनंतर फुफ्फुसात दिसू शकतो. नवजात मुलांमध्ये क्लेमायडिया डोळ्यांच्या संसर्गाच्या स्वरूपात किंवा न्यूमोनियाच्या स्वरूपात दिसू शकतो

पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवल्यावर होतात शरीरात 8 बदल, लग्नापूर्वी हे माहीत असायलाच हवे

महिलांमधील क्लेमायडियाची लक्षणे

महिलांमध्ये का होतो हा आजार

डॉ. परमिता भट्टाचार्य यांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये क्लेमायडियाची लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणूनच त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. पण त्यात काही सामान्य लक्षणेदेखील आहेत, जी ओळखणे महत्वाचे आहे. महिलांमध्ये क्लेमायडियाची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.

  • असामान्य योनीतून रक्तस्त्राव
  • लघवी करताना जळजळ किंवा वेदना
  • खालच्या ओटीपोटात वेदना
  • शारीरिक संबंध ठेवताना तीव्र वेदना जाणवणे
  • संसर्ग पसरल्यावर वंध्यत्वाची समस्या
  • तोंडावाटे संपर्क आला असेल तर घसा खवखवणे

पुरूषांमधील क्लेमायडियाची लक्षणे

पुरूषांमध्ये काय लक्षणे दिसतात

  • लिंगातून पांढरा, पिवळा स्त्राव
  • लघवी करताना जळजळ होणे
  • अंडकोषांमध्ये सूज किंवा वेदना
  • गुदाशयात वेदना

शारीरिक संबंधांपूर्वी ‘हे’ पदार्थ खाणे ठरेल त्रासदायक, रात्र काढणेही होईल कठीण

काय आहे उपाय 

कोणता उपाय करावा

जर एखाद्या व्यक्तीला क्लेमायडियाची लक्षणे दिसली तर त्याने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. क्लेमायडिया आहे की नाही हे शोधण्यासाठी, डॉक्टर मूत्र चाचणी किंवा स्वॅब चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतात. जर या चाचण्यांमध्ये क्लॅमिडीयासाठी सकारात्मक चाचणी आली, तर तुमचे डॉक्टर त्यापासून आराम मिळविण्यासाठी अँटीबायोटिक्स घेण्याची शिफारस करू शकतात. डॉ. पर्णमिता भट्टाचार्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीची क्लेमायडिया चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्याला बरे झाल्यानंतर काही आठवडे औषधे घ्यावी लागू शकतात. यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही.

Web Title: Can you suffer chlamydia without having physical intercourse experts answer in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • physical health
  • Physical Intercourse

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
4

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.