Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Cardamom Benefits: वेलचीचा वापर प्रामुख्याने चहा, खीर आणि बिर्याणीमध्ये चव व सुगंधासाठी केला जातो. मात्र या छोट्या मसाल्यात फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे पौष्टिक घटक असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 01:01 PM
Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वेलची पचन, गॅस आणि ऍसिडिटीच्या त्रासात मदत करू शकते.
  • तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास आणि हृदय व BP आरोग्याला सपोर्ट करू शकते.
  • ब्लड शुगरवरील परिणामाबाबत अजून संशोधन सुरू असल्याचे बातमीत नमूद आहे.
 

आपल्या स्वयंपाकघरात एक छोटीशी डबी असते, त्यात हिरव्या वेलच्या असतात. चहा असो, खीर असो किंवा बिर्याणी असो, वेलची टाकली की त्याचा वासच बदलून जातो. आपण फक्त वासासाठी आणि चवीसाठी वेलची वापरतो, पण तुम्हाला माहित आहे का, ही छोटी वेलची औषधाच्या गोळीपेक्षा कमी नाही. या छोट्या वेलचीमध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम असे कितीतरी पौष्टिक घटक भरलेले आहेत. लोक फक्त तोंडाचा वास जावा म्हणून वेलची चघळतात, पण त्याचे शरीराला होणारे फायदे खूप आहेत. Cardamom Benefits:

रोज वेलची खाल्ल्याने काय होतं.

1. पोटाच्या सगळ्या तक्रारी गायब

ज्यांना पोट फुगणे, गॅस, ऍसिडिटीचा त्रास असल्यास वेलची एकदम बेस्ट आहे. वेलचीचे तेल पोटातले पाचक रस वाढवते, त्यामुळे अन्न लवकर पचते. जेवणानंतर पोट जड झालं असेल तर एक वेलची चघळून बघा, लगेच आराम मिळेल. आतड्यांची हालचाल पण सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास पण कमी होतो.

2. तोंडाची दुर्गंधी जाईल आणि दात मजबूत होतील

तोंडातून वास येतोय? लोकांसमोर बोलायला लाज वाटते? तर वेलची खा. वेलची फक्त माऊथ फ्रेशनर नाही. यात अँटी-बॅक्टेरियल गुण आहेत, जे तोंडातले बॅक्टेरिया मारतात आणि दुर्गंधी थांबवतात. एवढंच नाही तर हिरड्यांना सूज आली असेल किंवा दात किडायला लागले असतील तर वेलची त्यापासून पण वाचवते. पूर्वीचे लोक म्हणूनच जेवणानंतर वेलची खायचे.

जेवणानंतर तुम्ही सुद्धा वेलची खाताय? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

3. हृदयासाठी चांगली

हृदय निरोगी ठेवायचं असेल तर वेलची मदत करते. यात असलेले नैसर्गिक घटक हृदयाला सपोर्ट करतात. रोजच्या आहारात थोडी वेलची असेल तर हृदयाच्या नसा चांगल्या राहतात. अर्थात, फक्त वेलची खाऊन हृदयाचा आजार बरा होणार नाही, पण होण्यापासून नक्की वाचवू शकते.

4. बीपी कंट्रोलमध्ये राहतं

ज्यांचा रक्तदाब म्हणजे बीपी जास्त असतो, त्यांनी वेलची नक्की खावी. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि डाययुरेटिक गुणधर्म आहेत. यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो. त्यामुळे बीपी नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत होते. गोळ्यांऐवजी हा नैसर्गिक उपाय करून बघायला हरकत नाही.

5. शरीरातील सूज कमी करते

कधी कधी शरीरात आतून सूज येते, दाह होतो, त्यामुळे दुखणं येतं. वेलचीमध्ये दाह कमी करणारे गुण आहेत. ती शरीरातील ती सूज कमी करायला मदत करते. त्यामुळे संतुलित आहारात वेलचीचा वापर केला तर शरीर आतून थंड राहतं. पण लक्षात ठेवा, कोणत्याही मोठ्या आजारावर वेलची हा उपचार नाही, ती फक्त सपोर्ट करते.

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी …

6. शुगर कंट्रोल करायला मदत

काही नवीन रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की वेलची रक्तातील साखर कंट्रोल करायला पण मदत करू शकते. यातले काही घटक आपल्या चयापचय क्रियेवर म्हणजे मेटाबॉलिझमवर चांगला परिणाम करतात. पण यावर अजून रिसर्च चालू आहे. त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी फक्त वेलचीवर अवलंबून राहू नये, औषधं चालू ठेवावीत आणि सोबत वेलची खावी. तर अशी आहे ही छोटीशी हिरवी वेलची. दिसायला छोटी पण कामं मोठी. उद्यापासून चहात किंवा जेवणानंतर एक वेलची खायला विसरू नका.

Web Title: Cardamom benefits digestion blood pressure blood sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifesytle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा
1

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
2

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
3

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.