काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच ऋतूंमध्ये महिलांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्वचेसंबंधित समस्या, आरोग्यासंबंधित समस्या इत्यादी अनेक कारणामुळे आरोग्य बिघडून जाते. महिलांना मोठ्या प्रमाणावर त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. त्यातील प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे काखेतील काळेपणा. काखेत काळेपणा वाढल्यानंतर महिला स्लीव लेस ड्रेस घालणे टाळतात. कोणतेही कपडे घालताना महिला खूप जास्त विचार करतात. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये काख स्वच्छ न केल्यामुळे आणि सतत घामाच्या वासामुळे काखेमधून दुर्गंधी येते.(फोटो सौजन्य-istock)
काखेत साचून राहिलेला काळेपणा घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम्स किंवा इतर महागडे प्रॉडक्ट आणून लावतात. पण तरीसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही. अशावेळी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. यामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि काखेतील काळे डाग निघून जातील. आज आम्ही तुम्हाला काखेतील काळेपणा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास काखेतील काळेपणा कमी होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे काखेतील काळेपणा कमी होईल आणि काख स्वच्छ होईल. यासाठी एक चमचा मध, अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा गुलाबपाणी घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण काखेतील काळ्या डागांवर लावून घ्या. २० मिनिटं लावून ठेवून झाल्यानंतर अंडरआर्म्स पाण्याचे स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि काहीदिवसांमध्ये फरक दिसून येईल.
काखेतील काळेपणा घालवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घ्या. पाण्यामध्ये तुरटीचा बारीक तुकडा टाकून अंघोळ झाल्यानंतर काखेत फिरवा. यामुळे काख स्वच्छ होईल आणि काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल. हा उपाय नियमित केल्यास काखेतील काळेपणा कमी होऊन आराम मिळेल. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी आहे.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा