तेलकट त्वचेसाठी घरगुती फेसपॅक
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येते. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरूम येणे, फोड येणे, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या त्वचेवर दिसून येतात. तसेच काही महिलांची त्वचा अतिशय तेलकट असते. त्वचा तेलकट असल्यामुळे त्वचेवर लगेच मुरूम किंवा फोड येतात. तेलकट त्वचेची योग्य काळजी घेतली नाहीतर त्वचेसंबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करावे, ज्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल. बाहेरून कुठूनही फिरून आल्यानंतर चेहऱ्यावर लगेच धूळ, माती जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेसाठी कोणती फेसपॅक वापरावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. त्वचा तेलकट किंवा कोरडी असल्यास तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता. यासाठी तांदळाची पेस्ट तयार करून त्यात 2 चमचे मध मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे पिंपल्सचे डाग, त्वचेसंबंधित इतर समस्या कमी होण्यास मदत होईल. मधामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांपासून त्वचेची सुटका करतात.
काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी बेसन फायदेशीर आहे. यासाठी वाटीमध्ये बेसन, लिंबाचा रस आणि दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता. यामुळे पिंपल्सचे डाग कायमचे निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल.
गुलाब पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. मध आणि गुलाब पाण्याचे मिश्रण त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल. तयार केलेले मिश्रण 20 मिनिटं त्वचेवर लावून ठेवा. नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
काकडीमध्ये असलेले पाणी त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी काकडीचा रस काढून त्यात मध मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास लवकर पिंपल्स कमी होतील आणि त्वचा स्वच्छ होईल.